Jayant Patil Vs Ajit Pawar : जयंत पाटलांचा 'प्रदेशाध्यक्ष'पदावरुन अजितदादांवर थेट वार; म्हणाले, '' मला कानात जरी सांगितलं असतं, तरी....''

NCP Crisis : '' प्रदेशाध्यक्षपदाच्या चर्चा जाहीर सभेत चर्चा करायच्या नसतात. मात्र...''
Ajit Pawar, Jayant Patil News
Ajit Pawar, Jayant Patil NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली होती. यात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाएवजी संघटनात्मक जबाबदारी देण्याची मागणी अजित पवार यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यांचा रोख प्रदेशाध्यक्षपदावर होता हे लपून राहिलेलं नाही. यानंतर काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर आता आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. याचदरम्यान, आता जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन अजित पवारांवर थेट वार केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बुधवारी(दि.५) वायबी सेंटर येथे बैठक बोलावली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी अजित पवारांसह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांसह भाजप शिवसेनेवरही टीकेची तोफ डागली. पाटील म्हणाले, प्रदेशाध्यक्षपदावरुन राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या वादावर देखील जयंत पाटलांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मला पवारसाहेबांनी सुचवलं होतं की, ६ तारखेला बैठक बोलावून आणि सर्वांशी चर्चा करुन बदल करावे लागतील. पण मी त्यावेळी त्यांना म्हटलं की, मला काहीच प्रॅाब्लेम नाही, तुम्ही मला आत्ता सांगा.

Ajit Pawar, Jayant Patil News
Rashtrawadi Congress Party: अमोल कोल्हेंवर मोठी जबाबदारी; पवारांच्या उपस्थितीत जयंत पाटलांची मोठी घोषणा

पण अशा चर्चा चर्चा जाहीर सभेत चर्चा करायच्या नसतात. मात्र, काहीजणांनी तो प्रघात नव्याने पाडलाय, मला कानात जरी सांगितलं असतं, मला व्हायचंय तरी मी त्याच कार्यक्रमात जाहीर केलं असतं की, मला बस झालंय आता दुसरं कुणालाही संधी द्या असंही पाटील यांनी यावेळी म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष कोणता तर १०५ आमदार भाजप(BJP) आहे. त्यात ४० आमदार असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. त्यांचे मंत्री किती तर ८ आहेत. त्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि गावित आपल्यातूनच गेले आहेत. म्हणजे तसेच आता तिकडे गेलेल्या आमदारांची संख्या नक्की माहिती नाही. कारण काही आमदार आजही पवारांना फोन करुन दोन दिवसांत येतो, तुमच्याशिवाय आम्ही काहीच निर्णय घेऊ शकत नाही असं सांगत आहे असंही पाटील म्हणाले.

Ajit Pawar, Jayant Patil News
Ajit Pawar Speech: वाट पाहिली पण साहेबांचा 'आशीर्वाद'च मिळाला नाही; अजितदादांनी व्यक्त केली खंत

तसेच दुसऱ्याची खबर खोदता खोदता स्वत: ची कबर खोदण्याचं काम भाजपनं सुरु केलं आहे. पक्ष ते फोडतायत आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना सांगितलं जातंय की थोडं थांबा असंही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात मी ३४ वर्ष आहे. पण एवढी घालमेल मी कधी राजकारणात पाहिली नव्हती. आमदारांच्या मनात इतकी धास्ती कधी पाहिलेली नव्हती. शिवसेने(Shivsena)सोबत जे घडलं तेच राष्ट्रवादीसोबत घडलं. त्यामुळे ठाकरेंच्या आमदारांना परतण्याचे वेध लागले आहेत असंही पाटील यावेळी म्हणाले.

Ajit Pawar, Jayant Patil News
Supriya Sule Speech : लढाई आता सुरु झाली आहे ; सुप्रिया सुळेंचा इशारा

आमच्या सरकारला तीन पक्षाची रिक्षा म्हणून हिणवलं जात होतं. ती चांगल्याप्रकारे सुरु होती. म्हणून तिच्यात बसण्याची इच्छा त्यांची झाली असा टोलाही पाटील यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.