Thane Political News : कळवा-खारेगाव येथील मैदान बंद करण्यावरून येथील मते महायुतीच्या विरोधात जाणारी आहेत. अशाप्रकारे अजितदादा खासदार कल्याण लोकसभेचे डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात काम करून, त्यांना पाडायचे काम करत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला. Jitendra Awhad News
आव्हाड रविवारी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) सडकून टीका केली. ते म्हणाले, तसेच कल्याण येऊन अजितदादांनी ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे. हे मुख्यमंत्री यांच्याविरोधात वक्तव्य आहे. पुण्यात शरद मोहोळ आणि परवा जी हत्या झाली, त्यावर ठणकावून सांगताना आमच्या ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांवर कशाला बोलता, अशी एकनाथ शिंदेंची बाजू घेतली. तसेच हे प्रकरण येथेच थांबवा, संघर्षाची ठिणगी पडली तर आम्ही मागे जाणार नाही, असेही अजित पवारांना उद्देशून आव्हाड म्हणाले.
अजितदादा तुम्ही छोट्या राजकारणात पडू नका, तुम्ही मुख्यमंत्री होण्याची ताकद असलेले मोठे नेते आहात, हे मी मान्य करतो. तुमच्या नेतृत्वातील उणिवा जाहीररित्या दाखवू नका, पटकन कोणी कानात बोलले म्हणून ऐकू नका, असा राजकीय सल्ला देताना आव्हाडांनी (Jitendra Awhad) उद्या येथील मैदानात खेळण्यास बंदी घातली तर त्याच मैदानाच्या आतमध्ये आमरण उपोषण सुरू करू. आम्हाला हलक्यात घेऊ नका, असा इशाराही दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आव्हाडला त्रास द्यावा, या हेतून निधी द्यायचा नाही, फाइल आडवायच्या, खोट्या केसेस टाकायच्या हे सर्व चालले. पण, लहान मुलांना आमचा खेळ बंद होऊ देणार नाही. तुम्हाला हात जोडून विनंती करतो, छोट्या राजकारणात अडकू नका, यातून आपली नाहक बदनामीच होते. एका लहान गावातील मुलांचे भवितव्य अजितदादांनी टाळे लावून बंद करून टाकले. पण, आपण भविष्य घडवणारी विकसनशील माणसे आहात, त्याला धक्का लावू नका, असे आवाहनही आव्हाडांनी केले.
सातबारा तुमच्या नावावर आहे का ?
विकासाबद्दल वारंवार बोलता, मग या पोरांचे विकास थांबवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला. तुमच्या नावावर येथील सातबारा आहे का, असा सवाल उपस्थित केला. गेल्या अनेक वर्षांपासून उघड्यावर या जमिनी आहेत.108 एकर जमीन होती, ती आता 72 एकरवर आले. लक्ष नाही ठेवले तर 40 वर येईल, त्यामुळे तेथे लक्ष द्या, असेही आव्हाड म्हणाले.
त्यांचे पालकत्व स्वीकारले
तुम्हाला निवडणुकीत मला हरवायचे आहे, हे मला माहीत आहे. पण ही पद्धत नाही हरवायची. अशा पद्धतीने तुम्ही मला हरवू शकत नाही. आजच कळव्यातील तुमचा उमेदवार आणि तुम्ही कळवेकरांच्या मनातून पडले आहात. येथे मराठी माणसे राहतात, मी त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. तुम्ही कोणाचे तरी ऐकता आणि सकाळी साडेसहा वाजता अधिकाऱ्यांना बोलवता सायंकाळपर्यंत ते बंद झाले पाहिजे, असे आव्हानही आव्हाडांनी उपमुख्यमंत्री पवारांना दिले.
ग्राउंड बंद करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना
कळव्यात आयटी पार्क, खेळायचे मैदान, जिल्हा क्रीडा संकुल देण्याऐवजी मैदान बंद करण्यापेक्षा कळव्याला काय देता ही अपेक्षा आहे. असे काही करायचे असेल तर तो अधिकार मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) आहे. ते आमच्या जिल्ह्याचे आहेत. त्यांनी आणि त्यांच्या मुलाने या मैदानाकडे तिरक्या नजरेनेही पाहिलेले नाही. त्याबद्दल दोघांचेही अभिनंदन करतो. पण, ग्राउंड बंद करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. पण, त्यांनी तसा आदेश दिलेला नाही. असेही आव्हाड यांनी सांगून हे माझ्यावरील रागापोटी आणि येथील चमच्यापोटी घेतल्याचेही दिसत असल्याची टीका अजित पवार गटावर केली.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.