Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड पुन्हा टार्गेटवर! घराबाहेर उभे राहून दिली थेट जीवे मारण्याची धमकी

Jitendra Awhad receives death threat outside house : जितेंद्र आव्हाड यांना घराबाहेर उभे राहून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. जाणून घ्या या घटनेची माहिती आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या घडामोडी.
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on: 
Updated on: 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. त्यांना एका अज्ञात व्यक्तीकडून फोनवर जिवे मारण्याची गंभीर धमकी देण्यात आली आहे.

या धमकीमुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका व्यक्तीने जितेंद्र आव्हाड यांच्या फोनवर संपर्क साधून त्यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

Jitendra Awhad
Shiv Sena Dussehra Melava : ठाकरेंचा यंदाचा दसरा मेळावा एका मुद्द्यावर गाजणार; पोस्टरने वाढविली उत्सुकता...

धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपण त्यांच्या घराबाहेर उभा असल्याचा दावा केला होता. या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ट्विट करून या धमकीबाबतची माहिती सार्वजनिक केली आहे.

याआधीही त्यांना अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. काही काळापूर्वी त्यांच्या घराजवळ बॉम्ब ठेवल्याची खोटी धमकी ईमेल द्वारे दिली गेली होती, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न आणखी गडद झाला होता.

Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Jitendra Awhad
Navid Mushrif Defeat : हसन मुश्रीफांना मोठा धक्का; गोकुळमध्ये पुत्र नविदचा दारुण पराभव, चालू मतमोजणीतून गेले उठून

या प्रकरणाच्या जितेंद्र आव्हाड यांनी अद्याप या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही, परंतु त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. काल घडलेल्या टायगर श्रॉफच्या प्रकरणासारख्या घटनांनंतर आमदारांना अशा प्रकारे थेट जिवे मारण्याच्या धमक्या येणे हे पोलिसांसमोर आणि कायदा व सुव्यवस्थेसमोर एक मोठे आव्हान उभे करत आहे. पोलिसांनी स्वतःहून या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com