Shiv Sena Dussehra Melava : ठाकरेंचा यंदाचा दसरा मेळावा एका मुद्द्यावर गाजणार; पोस्टरने वाढविली उत्सुकता...

Shiv Sena UBT Dussehra rally poster : उद्धव ठाकरे यांच्या यंदाच्या दसरा मेळाव्याची उत्सुकता वाढली आहे. पोस्टरमुळे कोणता राजकीय मुद्दा गाजणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. जाणून घ्या महाराष्ट्राच्या राजकारणातील ताजे अपडेट्स.
Shivsena Dasara Melava 2026
Shivsena Dasara Melava 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena UBT Dasara Melava poster : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या यंदाच्या दसरा मेळाव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दसरा मेळावा 2026 साठी पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमुळे कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. ‘संविधान रक्षणार्थ’ ही टॅगलाईन देत ठाकरे सेनेने यंदाच्या मेळाव्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे. विशेष म्हणजे, या पोस्टरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आंदोलनातील आक्रमक फोटो झळकल्याने चर्चेला आणखी रंग चढला आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून दसरा मेळाव्याचे पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाचा मुद्दा मांडण्यात आला आहे. पक्षाने दिलेल्या संदेशामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात कोणते मुद्दे केंद्रस्थानी असतील, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Shivsena Dasara Melava 2026
Khandala Sugar Factory Election Date Update : मोठी बातमी! खंडाळा साखर कारखाना निवडणूक जाहीर; 'या' तारखेला होणार मतदान, कोण उधळणार गुलाल?

‘हुकूमशाहीला दणका देण्यासाठी,

लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी...

चला, एल्गार करूया!’

असा संदेश या पोस्टरवर देण्यात आला आहे. ‘यंदाचा दसरा मेळावा संविधान रक्षणार्थ’ ही टॅगलाईनही लक्षवेधी ठरत आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यात संविधान, लोकशाही आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील राजकीय भूमिका यांवर ठाकरे सेना भर देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shivsena Dasara Melava 2026
Tiger Shroff Firing Latest Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट : पोलिसांची मोठी कारवाई, सुरत एक्सप्रेसमधून 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

दसरा मेळावा 2026 चे ठिकाण शिवतीर्थ, दादर असून, सायंकाळी 5:00 वाजता मेळावा होणार आहे. शिवाजी पार्कवरील या मेळाव्याला ठाकरे सेनेच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यामुळे यंदाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे कोणती भूमिका मांडतात आणि आगामी राजकीय घडामोडींबाबत काय संदेश देतात, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com