जितेंद्र नवलानी ईडीचा मोठा एजंट, बिल्डर अविनाश भोसलेंनीही दिली रक्कम

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचा (ED) एजंट असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. नवलानी याच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहे. पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंनीही ७ कोटी रुपये दिले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.

भोसले यांच्यासह DHFL घोटाळ्यातही नवलानी याचा संबंध आहे. या कंपनीकडून नवलानी याच्या अकौंटवर 25 कोटी खात्यावर जमा, वाधनवान कडून दहा कोटी आणि अविनाश भोसलेंच्या कंपन्याकडून सात कोटी रुपये जमा झाला आहे, असे राऊत यांनी सांगितले. जीतेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांना कोट्यवधी रुपये कसे दिले जातात, असा सवाल राऊत यांनी केला आहे. नवलानी आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा काय संबंध आहे हे मी लवकर सांगणार आहे, असा ईशाराही राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut
एक्झिट पोलनंतर 'मगोप'चा भाव वाढला; भाजपसह काँग्रेसनं टाकला गळ

हे मोठे रॅकेट मुंबई आणि दिल्लीत बसून चालले जात आहे. मी आता जे सांगितले आहे ते फक्त दहा टक्के आहे. याबाबत दक्षता विभागाचा रिपोर्ट देखील आला आहे. हा रिपोर्टदेखील पंतप्रधानांना माहिती आहे. जितेंद्र नवलानी आणि ईडीच्या चार अधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीबद्दल मुंबई पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. मुंबई पोलिस याची चौकशी सुरू करत आहेत. ईडीचे काही अधिकारी तुरुंगात जाणार. माझे शब्द लिहून ठेवा, असेही राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut
Sanjay Raut Live : सोमय्या बापबेटे तुरुंगात जाणार

ईडीचा सारा पैसा विदेशात चालला आहे. यात वसुलीत भाजपचे नेते देखील सहभागी आहेत. याची सारी माहिती मी देणार आहे. त्याची अधिकृत तक्रार मी दाखल केली आहे. मी हे सारे कागदावर बोलतो आहे. आता आमच्या महाराष्ट्र पोलिसांकडे याची कागदपत्रे दिली आहेत. महात्मा किरीट सोमय्या हे आमच्याविरोधात कागद फडकवतात. ती पीएमसी बॅंक घोटाळा, डीएचएफल याच्याबद्दल ते आम्हाला प्रश्न विचारतात. मात्र, डीचएफएलच्या वाधवान सोबत सोमय्या यांचे काय संबंध आहेत, हे मी विचारले होते, असेही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com