Shivsena News : कल्याण-डोंबिवलीत युतीची मतदानापूर्वीची घौडदौड कायम; भाजपपाठोपाठ शिवसेनेच्या बिनविरोध उमेदवारांचा चौकार

Kalyan Dombivli Municipal Election : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत भाजपनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने खाते उघडत चार उमेदवार बिनविरोध विजयी करून महायुतीची ताकद दाखवली.
Shiv Sena leaders celebrate as three party candidates secure unopposed victories in Kalyan-Dombivli municipal elections, reinforcing the BJP-led Mahayuti’s strong start.
Shiv Sena leaders celebrate as three party candidates secure unopposed victories in Kalyan-Dombivli municipal elections, reinforcing the BJP-led Mahayuti’s strong start.Sarkarnama
Published on
Updated on

Kalyan Dombivli News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा खालोखाल शिवसेना पक्षाने देखील मतदानापूर्वीच खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक 24 मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे शिवसेनेचे 3 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय याच प्रभागातून भाजपच्या ज्योती पाटील यांचाही विजय निश्चित झाल्याने, महायुतीने या प्रभागावर संपूर्ण पकड मिळवली आहे. या 3 उमेदवारांव्यतिरिक्त प्रभाग क्रमांक 28 मधून शिवसेनेचे उमेदवार हर्षल राजेश मोरे हे बिनविरोध विजयी झाले आहेत.

प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात माघार घेतल्याने बिनविरोध निकाल लागले. मात्र, हा निकाल केवळ तांत्रिक विजय नसून, तो शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यवस्थापनाचा परिणाम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीच्या सुरुवातीलाच शिवसेनेने बिनविरोध तिहेरी विजय मिळवत वातावरण आपल्या बाजूने वळवले आहे.

या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तिन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे. कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत गटबाजी, नाराजी आणि इच्छुकांची संख्या पाहता हा विजय सहज मिळालेला नसून, स्थानिक पातळीवरील समन्वय, संवाद आणि अचूक राजकीय गणित यामुळेच हे यश मिळाल्याचे बोलले जात आहे.

Shiv Sena leaders celebrate as three party candidates secure unopposed victories in Kalyan-Dombivli municipal elections, reinforcing the BJP-led Mahayuti’s strong start.
Mumbai Shivsena : शिंदे गटाचा मोठा निर्णय! 'या' शहरांची कार्यकारिणी बरखास्त; काय आहे कारण?

विशेष बाब म्हणजे, या प्रभागातील शिवसेनेचा बिनविरोध विजय हा आगामी राजकीय समीकरणांचा संकेत मानला जात आहे. महायुतीचा महापौर बसणार, आणि त्यामध्ये शिवसेनेची नगरसेवक संख्या लक्षणीय असेल, अशी चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या एक-दोन दिवसांत आणखी काही प्रभागांमध्येही शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Shiv Sena leaders celebrate as three party candidates secure unopposed victories in Kalyan-Dombivli municipal elections, reinforcing the BJP-led Mahayuti’s strong start.
BJP vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे-भाजप युती कागदावर, रणांगणात संघर्ष! कल्याण डोंबिवलीत 9 ठिकाणी बंडखोरी

निकाल जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून, हा विजय केवळ एका प्रभागापुरता मर्यादित न राहता आणखीन काही प्रभागात आपले खाते बिनविरोध उघडण्यासाठी शिवसेनेने पाऊल उचलले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com