

BJP Politics : महापालिका निवडणुकीतील मतदानापूर्वीच भाजपने 3 महानगरपालिकांमध्ये गुलाल उधळला आहे. कल्याण डोंबिवली, पनवेल आणि धुळे इथले भाजपचे काही उमेदवार विजयी झाले आहेत. बिनविरोध निवडून येताच उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष केला. शिवाय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अभिनंदन केले.
कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रभाग २६ (क): आसावरी नवरे, प्रभाग १८ (अ): रेखा चौधरी, प्रभाग क्रमांक २६ ब मधून रंजना मितेश पेणकर या बिनविरोध निवडून आल्या आहेत. अन्य कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने येथे अर्ज भरला नाही किंवा छाननीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने या तिन्ही उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले.
धुळे महापालिकेतही प्रभाग 1 `अ’ मधील भाजपच्या उमेदवार उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग 6 `ब’ मधील ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेवेळीच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे.
पनवेल महापालिकेतही भाजपने खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 18 मधील उमेदवार नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. येथील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाला. तर अन्य उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.