Aditya Thackeray: मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात 'अजिंक्यतारा चमकणार'; ठाकरे गटाकडून बॅनरबाजी

Kalyan Lok Sabha Constituency:ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kalyan: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा बालेकिल्ल्यात आज ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे. आदित्य ठाकरे कल्याण पूर्व मतदार संघात येणार आहेत. कल्याण पूर्वे कोळशेवाडी येथील शाखेला भेट देणार आहेत. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी परिसरात बॅनर झळकले आहेत.

आदित्य ठाकरे कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या महिनाभरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांचा दौरा झाला त्यानंतर आज आदित्य ठाकरे यांचा दौरा असल्याने ठाकरे गटाने कल्याण लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळते.

Aditya Thackeray
Rohit Pawar: राज ठाकरे महायुतीत आले तर...रोहित पवार म्हणाले...

आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कल्याण कोळशेवाडी शहर शाखेतर्फे जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. शाखेजवळ लावण्यात आलेला 'कल्याण लोकसभा नगरीत अजिंक्यतारा चमकणार' हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचे घटना नुकतीच घडली आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहे.

गेल्या दोन वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वमध्ये देखील मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ झाली आहे .या सर्वच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे काय बोलतात, कुणावर टीका करणार? हे लवकरच समजेल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com