Kangana Ranaut : ठरलं! 2024 ला कंगना 'या' ठिकाणाहून निवडणूक लढवणार; जवळच्या व्यक्तीने केलं शिक्कामोर्तब

Loksabha Election 2024 : काही दिवसांपूर्वी कंगनाने देखील राजकारणात येण्याविषयी मोठं विधान केलं होतं.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अभिनेत्री कंगना रनौतने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड गाजवल्यानंतर ती आता राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. ती नेहमीच मोदी सरकारच्या निर्णयांचे समर्थन करत आली आहे. कंगना आपल्या बेधडक विधानांसाठी नेहमीच चर्चेत असते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ठाकरे आणि रनौत यांच्यात चांगलेच खटके उडाले होते. आता कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत मिळत आहे.

अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) भाजपच्या तिकिटावरच निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंगनाला जर भाजपने तिकिट दिले तर ती हिमाचल प्रदेश किंवा महाराष्ट्रातून निवडणूक लढवू शकते अशी माहिती तिचे वडील अमरदीप रनौत यांनी दिली आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा पक्ष घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Kangana Ranaut
Sujay Vikhe : नगर जिल्ह्यात येणार मोठे उद्योग; जमीन 'एमआयडीसी'कडे वर्ग करण्याचा मार्ग मोकळा

काही दिवसांपूर्वी कंगनाने देखील राजकारणात येण्याविषयी मोठं विधान केलं होतं. भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले तर लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार असल्याचे अभिनेत्री कंगना रनौत म्हणाली होती. ती देवर्शनासाठी द्वारकाधीश मंदिरात आली होती. त्यावेळी तिने लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले होते.

अभिनेत्री कंगना रनौतने एका मुलाखतीत कलाकार असल्यामुळे मला राजकारणात रस आहे, पण आता राजकारणाशी जोडले जाणे माझ्यासाठी खूप घाई होईल, अशी भूमिका स्पष्ट केली होती. तसेच मोदी सरकारमुळे (Modi Government) देशात अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि आपला भारत दिवसेंदिवस चांगला होत असल्याचे म्हणत कौतुकोद्गगारही काढले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

कंगनाने माझी क्रांतिकारी विचारधारा राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जुळत असून याचमुळे या देशभक्त संस्थेच्या कार्यपद्धतीने मी प्रभावित झाली असल्याचेही तिने सांगितले होते. एवढेच नव्हे तर आरएसएसने देशाला जोडण्याचे काम केले आहे. संघाने प्रशिक्षित केलेले लोक सत्तेवर आल्यावर जे काम 70 वर्षांत झाले नाही ते गेल्या 8 ते 10 वर्षांत झाले असेही कंगना म्हणाली होती.

(Edited By Deepak Kulkarni)

Kangana Ranaut
Modi Government : ...पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दिल्लीश्वरांकडे वेळ नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com