Manikrao Kokate: इकडे कोकाटेंचा विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा; तिकडे राजीनाम्यासाठी 'दिल्ली'त हालचाली; 'मामा कनेक्शन' मोठा निर्णय घेणार?

Mahavikas Aagahdi MP Meets Shivraj Singh Chouhan: महायुती सरकारमधील कृषिमंत्री मणिकराव कोकटेंचा राजीनामा घेण्यासाठी आता महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही राजकीय हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
Manikrao Kokate And mva MP Shivrajsingh chauhan  (1).jpg
Manikrao Kokate And mva MP Shivrajsingh chauhan (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

थोडक्यात बातमी:

  1. रमी सर्कल खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनाच्या सभागृहात मोबाईलवर रमी सर्कल खेळताना दिसल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

  2. राजकीय दबाव आणि राजीनाम्याची मागणी: सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेऊन कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

  3. कोकाटेंचा बचाव आणि कोर्टाची धमकी: कोकाटेंनी आरोप फेटाळून लावत हा फक्त जाहिरातीचा भाग असल्याचा दावा केला व विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला.

Mumbai News: राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळाच्या सभागृहात रमी सर्कल खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कोकाटेंच्या या व्हिडिओवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढंच नव्हे तर तटकरेंनी पक्ष माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेईल म्हणत थेट राजीनाम्याचे संकेतही दिले. पण याचदरम्यान, आता राजधानी दिल्लीतून याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. (Amid Rummy Circle controversy, Manikrao Kokate warns of legal action as MVA MPs demand his resignation in Delhi, meeting Union Minister Shivraj Singh Chouhan)

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात राजकीय सर्वच स्तरांतून संतापाची तीव्र लाट उसळली असतानाच त्यांनी मंगळवारी(ता.22)पत्रकार परिषद घेत विरोधकांवर हल्लाबोल करतानाच त्यांना कोर्टात खेचण्याचा इशाराही दिला. पण इकडे कोकाटे आक्रमक झाले असतानाच तिकडे महाविकास आघाडीच्या खासदारांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी थेट दिल्लीतूनच सूत्रे फिरवली.

महायुती सरकारमधील कृषिमंत्री मणिकराव कोकटेंचा राजीनामा घेण्यासाठी आता महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीतही राजकीय हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीचे खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत यांच्यासह बजरंग सोनावणे यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आहे.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावरील 'एक्स'वरती ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांची आज भेट घेतली.

Manikrao Kokate And mva MP Shivrajsingh chauhan  (1).jpg
मोठी बातमी : IPS जालिंदर सुपेकर अन् अमिताभ गुप्ता यांना फडणवीसांकडून क्लिनचीट; शेट्टी, धस अन् दमानियांचे आरोप ठरले फुसका बार

याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेतरमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत असल्याची भूमिका चौहान यांच्यासमोर मांडल्याचं सांगितलं आहे.

सुळे पोस्टमध्ये म्हणतात, शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की, कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच. तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत असल्याचा उल्लेखही त्यांनी बोलून दाखवला आहे.

Manikrao Kokate And mva MP Shivrajsingh chauhan  (1).jpg
Kolhapur Politics : काँग्रेस निष्ठावंतांचे पूत्र अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाणार, आधी फक्त चर्चा आता बॅनरमधून दिले स्पष्ट संकेत

म्हणूनच माणिकराव कोकाटेंचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषिमंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी यांनी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली असल्याचं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्टाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे अधिवेशन काळात सभागृहात मोबाईलच्या स्क्रीनवरती रमी सर्कलवरती गेम खेळत असल्याचे एकापाठोपाठ एक असे तीन चार धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरत कोकाटेंच्या राजीनाम्याची जोरदारपणे मागणी उचलून धरली आहे.

माणिकराव कोकाटे काय म्हणाले?

विरोधकांच्या आरोपांनंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्हिडीओवरती खुलासा करताना ती फक्त जाहीरात आली होती, मला रमी गेम खेळताही येत नसल्याचं म्हटलं होतं. तसेच ऑनलाइन रमी काय माहीत आहे का. ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही असा दावाही कोकाटेंनी केला होता.

माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना आपण कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही कृषिमंत्र्यांनी विरोधकांना देत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Manikrao Kokate And mva MP Shivrajsingh chauhan  (1).jpg
Haribhau Bagade: उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत महाराष्ट्रातील 'या' नेत्याचे नाव आघाडीवर
  1. प्रश्न: माणिकराव कोकाटेंविरोधात वाद का निर्माण झाला?
    उत्तर: अधिवेशन काळात रमी सर्कल खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वाद झाला.

  2. प्रश्न: महाविकास आघाडीने काय पाऊल उचललं?
    उत्तर: खासदारांनी दिल्लीमध्ये केंद्रीय कृषिमंत्रीची भेट घेऊन कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

  3. प्रश्न: माणिकराव कोकाटे यांनी आरोपांवर काय प्रतिक्रिया दिली?
    उत्तर: त्यांनी आरोप फेटाळले आणि कोर्टात कारवाईचा इशारा दिला.

  4. प्रश्न: सुप्रिया सुळे यांनी ट्विटमधून काय मागणी केली?
    उत्तर: त्यांनी संवेदनशील कृषिमंत्र्याची तातडीने नियुक्ती करण्याची मागणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com