Karuna Munde: करुणा मुंडेंची 'सातपुडा' बंगला न सोडणाऱ्या धनंजय मुंडेंना मोठी ऑफर; म्हणाल्या, 'त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत...

Dhananjay Munde News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडायला तयार नसल्यामुळे टीकेची धनी होत आहे. याचवेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या घरी राहायला येण्याची ऑफर देऊ केली आहे.
Dhananjay Munde And Karuna Munde .jpg
Dhananjay Munde And Karuna Munde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा देऊन पाच महिने उलटले असले तरी त्यांचा सरकारी बंगला सातपुडा सोडायला का तयार नाहीत? असा सवाल उपस्थित करत आरोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. याचदरम्यान, करुणा मुंडे (Karuna Munde) यांनी या वादात उडी घेत धनंजय मुंडेंना मोठी ऑफर दिली आहे.

धनंजय मुंडे यांनी महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सरकारकडून सातपुडा नावाचा बंगला देण्यात आला होता. सध्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झालेले भुजबळ सातपुड्यावर राहायला जाण्यासाठी वेटिंगवर आहेत. तर मुंडेंचा स्वतःचा गिरगाव चौपाटीवर आलिशान फ्लॅट असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) सातपुडा बंगला सोडायला तयार नसल्यामुळे टीकेची धनी होत आहे. याचवेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या घरी राहायला येण्याची ऑफर देऊ केली आहे. त्यांनी धनंजय मुंडेंचं मुंबईमध्ये गिरगाव आणि पवईमध्ये दोन आलिशान फ्लॅट असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केला आहे. त्यात भर म्हणजे धनंजय मुंडेंनी आपल्या घरी राहायला यावं, असा आग्रहही त्यांनी केला आहे.

करुणा शर्मा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन-चार घरे आहेत. पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्ये आमचे देखील घर आहे. जर धनंजय मुंडेंना घर नसेल, तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी राहायला यावं,असंही त्यांनी सांगितलं.

Dhananjay Munde And Karuna Munde .jpg
Ajit Pawar: अजित पवारांचा आमदार 'बर्थ डे' सेलिब्रेशनमध्ये बिझी; भाजपनं मतदारसंघातच लावला 'करेक्ट कार्यक्रम'

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीवेळी धनंजय मुंडेंनी सादर केलेल्या शपथपत्रामध्येही गिरगाव चौपाटी येथील फ्लॅटचा उल्लेख आहे. या फ्लॅटमध्ये कुणीही राहत नाही. गिरगाव चौपाटी येथील वीरभवन बिल्डिंगमध्ये 9 व्या मजल्यावर 902 क्रमांकाचा मुंडेंचा हा आलिशान फ्लॅट आहे. हा फ्लॅट तब्बल 2 हजार 151 फुटांचा आहे. त्याची किंमत तब्बल 16 कोटी आहे.

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंनी आपलं मुंबईत घर नसल्यानं आपण सरकारी बंगला सोडत नसल्याचं कारण दिलं होतं. त्यांनी सरकारी बंगला न सोडल्यामुळे मुंडेंना आतापर्यंत त्यांना 42 लाखांचा दंड झाला आहे. तसेच त्यांनी मुंबईतलं माझं घर सध्या राहण्यायोग्य नसून तिथे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचं मुंडेंनी यावेळी सांगितलं होतं.

Dhananjay Munde And Karuna Munde .jpg
Modi Government: मोदी सरकारला पहिला धक्का? 'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात...'; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

तसेच त्यांनी आपल्या लहान मुलीची शाळा याच परिसरात असल्याचं सांगत विविध आजारांवरच्या उपचारासाठी त्यांना मुंबईत राहणे आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. पण या भागात एवढ्या तातडीनं भाड्यानं घर मिळणं सध्या कठीण असून आपण घर शोधत असल्याचा खुलासाही केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com