KDMC Election : डोंबिवलीत भाजप-शिंदेच्या शिवसेनेत ‘मैत्रीपूर्ण’ लढत; नंदू परबांकडून 'अंबरनाथ पॅटर्न'चा इशारा

KDMC Election BJP Vs Shiv Sena : भाजपा आणि शिंदे सेनेचे उमेदवारच एकमेकांविरोधात रिंगणात उतरले असून येथील विजय आता दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे.
KDMC Election
KDMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

KDMC Election News : कल्याण-डोंबिवली मध्ये भाजपा आणि शिंदे सेनेत युती झाली असून मित्र पक्षाला सीट सोडण्यासाठी दोन्ही पक्षातील इच्छुकांनी आपल्या इच्छेवर पाणी सोडले आहे. मात्र केवळ एका पॅनल मध्ये ही युती होऊ शकली नसून येथे मैत्रीपूर्ण लढत होताना दिसत आहे.

पॅनल 29 मध्ये शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजपा असे चित्र असून अंबरनाथ पॅटर्न डोंबिवली मध्ये राबवून तेथे कमळ फुलवण्यात येईल, असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी केला आहे.

कल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या 20 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आता उरलेल्या जागेवर विजय मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष तयारीला लागले आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील पॅनल 29 मध्ये मात्र वेगळे चित्र दिसून येत आहे. येथे भाजपा आणि शिंदेंचे उमेदवारच एकमेकांविरोधात रिंगणात उतरले असून येथील विजय आता दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे.

KDMC Election
Ulhasnagar Municipal Election : उमेदवारीसाठी तीन पक्ष बदलले; अजितदादांची संधी डावलली, आता शिंदेंच्या शिलेदारांमागे फिरण्याची वेळ!

याविषयी भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब म्हणाले, प्रभाग 29 मध्ये युतीत मैत्रीपूर्ण लढत आहे; मात्र भाजप आपली पूर्ण ताकद लावणार आहे. पॅनल मधील आयरे गावचा भाग सोडला तर बाकी ठिकाणी पूर्ण ठिकाणी चिखल झाला आहे. या चिखलात आता कमळ फुलवण्याची वेळ आलो आहे. येथे शंभर टक्के अंबरनाथ पॅटर्न राबवून कमळ फुलवलं जाईल.

भाजपचे उमेदवार मंदार टावरे यांच्या प्रचारासाठी नंदू परब आले होते. ते म्हणाले, राजकारणात वारसाहक्क नव्हे तर कार्यकर्त्यांच्या कष्टाला महत्त्व मिळाले पाहिजे

KDMC Election
Nashik NMC Election : आमची लढाई मित्रपक्ष शिवसेनेशीच, बाकीचे कुठेच नाही.. गिरीश महाजनांनी दंड थोपाटले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com