''भावना गवळी अजून किती दिवस बाहेर राहाल?"

भावना गवळींचे (Bhawna Gawali) वकील इंद्रपाल सिंह यांनी भावना गवळी यांना चिकनगुनिया झाल्याने त्या येऊ शकत नसल्याचे सांगितले होते.
Kirit Somaiya- Bhavana Gawali
Kirit Somaiya- Bhavana GawaliSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : ''भावना गवळी (Bhavna Gawali) किती दिवस बाहेर राहणार आहेत, असे म्हणत भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांनी शिवसेना खासदार भावना गवळींवर निशाणा साधला आहे. भावना गवळी यांना ईडीने त्यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावत आज ( 20 ऑक्टोबर) चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. पण चिकनगुनिया झाला असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा 15 दिवसांचा वेळ मागितला. यावर किरीट सोमय्यांनी भावना गवळींवर निशाणा साधला आहे.

वाशिम (Washim) येथील बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीप्रकरणी ईडीने 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावले होते. मात्र त्यावेळी त्या हजर झाल्या नाहीत. त्यावेळी त्यांनी वेळ वाढवून मागितली होती. तेव्हा त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली. त्यानंतर आता 15 दिवसांनी ईडीने त्यांना दुसरे समन्स बजावून आज (20 ऑक्टोबर) हजर राहण्यास सांगितले होते. पण यावेळीही त्यांनी त्या चौकशीला हजर राहणार नसल्याचे सांगितले. भावना गवळींचे वकील इंद्रपाल सिंह यांनी, भावना गवळी यांना चिकनगुन्या झाल्याने त्या येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना 15 दिवसांची मुदतवाढ मिळण्याची विनंती केली.

Kirit Somaiya- Bhavana Gawali
ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला न्यायालयाकडून दणका

नक्की काय आहे प्रकरण?

दरम्यान, शिवसेनेचे माजी नगरसेवक हरीश सारडा यांनी खासदार भावना गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड कारखान्याच्या विक्रीत कोट्यवधींचा आर्थिक घोळ केल्याची तक्रार केली होती. या प्रकरणी खासदार गवळींवर गुन्हा दाखल करावा, अशी याचिका सारडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने खासदार गवळींना नोटीससुद्धा बजावली आहे.

त्यानंतर प्लायवूड कारखाना सुरु करुन लोकांना रोजगार देण्याच्या नावावर गवळी कुटुंबीयांनी राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ व राज्य शासनाकडून अनुक्रमे २९ कोटी १० लाखांची आणि राज्य शासनाने १४ कोटी ५५ लाखांचे अनुदान घेतले होते. मात्र, प्रत्यक्षात कारखाना सुरूच केला नाही. त्यानंतर अनेक वर्षानंतर कारखान्याचे मूल्य कमी करीत आपल्याच एका कंपनीला कारखाना विकला. खासदार गवळी यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत याचिकाकर्त्याने रिसोड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com