ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला न्यायालयाकडून दणका

आर्यन मागील तेरा दिवसांपासून तुरूंगात आहे.
Aryan Khan
Aryan Khansarkarnama
Published on
Updated on

मुंबई : कार्डिलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सेशन कोर्टातील विशेष NDPS कोर्टात बुधवारी (ता. 20) सुनावणी झाली. अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने (NCB) आर्यनच्या जामीनाला जोरदार विरोध करत त्याच्याविरोधात काही नवीन पुरावे न्यायालयात सादर केले होते. तसेच आर्यनच्या बाजूनेही त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला होता. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवादानंतर न्यायालयाने आज आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

आर्यन मागील तेरा दिवसांपासून तुरूंगात आहे. आर्यन खानच्या वतीनं ज्येष्ठ वकिल अमित देसाई व सतीश मानेशिंदे यांन बाजु मांडली होती. तर NCB कडून ASG अनिल सिंह यानी बाजु मांडली होती. या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. पण एनसीबीने आर्यनच्या व्हॉट्स अॅप चॅटची माहिती न्यायालयात सादर केली होती. तसेच काही जुन्या डॅग्ज प्रकरणांचा संदर्भही न्यायालयाने दिला होता. त्याचआधारे न्यायालयाने आर्यनचा जामीन फेटाळला आहे. त्याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या दोघांचा जामीनही फेटाळण्यात आला आहे.

Aryan Khan
आर्यनच्या जामिनासाठी भाजप नेत्यानं केली प्रार्थना अन् शुभेच्छाही...

आर्यनचा जामीन फेटाळण्यामागे व्हॉट्स अॅप चॅट आणि त्याच्यासोबतच्या इतर जणांकडे डॅग्ज सापडणे हे आर्यनला भोवल्याचे दिसते. बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा 23 वर्षीय मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनाऱ्यावरील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टी छाप्यादरम्यान अटक केली होती. यानंतर 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने आर्यनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानसोबत एनसीबीने आणखी सात जणांनाही अटक केली होती. या प्रकरणात परदेशी नागरिक आणि कथित अमली पदार्थ तस्करांसह एकूण वीस जणांना अटक करण्यात आली आहे.

आर्यन खानसह अटक केलेल्या इतर सात जणांमध्ये मुनमुन धामेचा, अरबाज मर्चंट, इस्मीत सिंग, मोहक जसवाल, गोमित चोप्रा, नुपूर सतिजा आणि विक्रांत छोकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी छाप्यादरम्यान 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमए (एक्स्टसी) च्या 22 गोळ्या आणि 1.33 लाख रुपये जप्त केले आहेत.

त्याचवेळी, आर्यन खानच्या जामीन अर्जामध्ये, त्याच्या वकिलाने म्हटले होते की तो "निर्दोष आहे आणि त्याने कोणताही गुन्हा केला नाही. आर्यन खानकडून कोणतीही पुनर्प्राप्ती झालेली नाही हे स्वीकारले जाणारे पद आहे आणि हे देखील याचिकेत म्हटले आहे. NCB कडे त्याच्या विरोधात कोणतीही आक्षेपार्ह सामग्री नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com