BMC Election : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरला! उद्धव ठाकरेंनी बलाढ्य सत्ताधाऱ्यांना नाकीनऊ आणण्यासाठी माजी महापौरांकडे दिली मोठी जबाबदारी

Kishori Pednekar group leader News : महापालिकेत सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खास प्लॅन तयार केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता सर्वच पक्ष सत्तेची समीकरणे जुळवण्यात व्यस्त दिसत आहेत. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेकडे काठावर बहुमत आहे. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी वेगवान हालचाली दोन्ही पक्षात घडत आहेत. दुसरीकडे गेली 25 वर्ष सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यावेळी विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. त्यासाठी आतापासूनच तयारी केली जात आहे.

महापालिकेत बलाढ्य भाजपला नाकीनऊ आणण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खास प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी गटनेतेपदाची जबाबदारी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गटनेते हेच दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते समजले जातात. त्यामुळे आक्रमक आणि मुलूख मैदानी तोफ अशी ओळख असलेल्या पेडणेकर पुढील विरोधी पक्षनेत्या असणार आहेत.

Uddhav Thackeray
Eknath Shinde : 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या भूमिकेमुळेच शिवसेचं नुकसान; मुख्यमंत्री शिंदेंची टीका

राज्यातील 29 महानगरपालिकामधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता सर्व महापालिकांसाठी महापौरपदाची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्याकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले असतानाच आता मुंबई महापालिकेतील उद्धव ठाकरे यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. त्यामध्ये पेडणेकर यांच्यावर गटनेटपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Uddhav Thackeray
BJP Politics: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेना धक्का; कारागृहातील मुक्काम पुन्हा वाढला!

उद्धव ठाकरेंचा मोठा प्लॅन

मुंबई महानगरपालिकेची सत्ता हातातून निसटली असली, तरी मुंबईवरील आपला प्रभाव कमी होऊ द्यायचा नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी केला आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेना युतीने मुसंडी मारली असतानाच, आता पालिकेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेण्यासाठी ठाकरेंनी आपल्या सर्वात आक्रमक 'रणरागिणी'ला समोर केले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची शिवसेनाच्या गटनेतेपदी नियुक्ती करून 'मातोश्री'ने एक स्पष्ट संदेश दिला आहे.

Uddhav Thackeray
Shivsena-BJP News : महापालिका विजयाने भाजप 'सातवें आसमान पर' : शिवसेनेला तब्बल 11 जागांवर दमवणार?

सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणार

मुंबईची खिंड लढविण्यासाठी आता खुद्द एक अनुभवी योद्धा सज्ज झाला आहे. ज्या किशोरी पेडणेकरांनी कोरोना काळात आणि महापदावर असताना भाजपशी दोन हात केले, त्याच पेडणेकर आता गटनेते म्हणून सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. या निवडीमुळे मुंबई महापालिकेतील कामकाज अत्यंत वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com