Shivsena-BJP News : महापालिका विजयाने भाजप 'सातवें आसमान पर' : शिवसेनेला तब्बल 11 जागांवर दमवणार?

ZP Election BJP ShivSena : महापालिकेतील यशानंतर भाजप झेडपीसाठी शिवसेनेसोबत युती टाळताना दिसतो आहे. फुलंब्री व कन्नडमधील अकरा जागांवरून वाद तीव्र झाला असून युती तुटण्याची शक्यता वाढली आहे.
BJP and Shiv Sena leaders amid tense negotiations over Zilla Parishad seat sharing in Chhatrapati Sambhajinagar, highlighting alliance uncertainty after BJP’s municipal election victory.
BJP and Shiv Sena leaders amid tense negotiations over Zilla Parishad seat sharing in Chhatrapati Sambhajinagar, highlighting alliance uncertainty after BJP’s municipal election victory.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar ZP Election : महापालिका निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेसोबत युतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे भासवत दोन तासाआधी दोन्ही पक्षांनी स्वबळावर आपापल्या उमेदवारांना बी फाॅर्म दिले. युती न करण्याचा भाजपचा प्लान यशस्वी ठरला आणि त्यांनी स्वबळावर महापालिकेत 57 नगरसेवक निवडून आणले. पण शिवसेनेला मात्र युती तुटल्याचा मोठा फटका बसला. त्यांना 13 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर आता जिल्हा परिषदेसाठी युतीचा पुन्हा तोच खेळ सुरू झाला आहे.

रात्री उशीरापर्यंत शिवसेना-भाजप नेत्यांच्या बैठकीत युतीवर तोडगा निघाला नाही. तर आज दुपारी 12 वाजता हाॅटेलमध्ये पुन्हा एकदा बैठक बोलावण्यात आली. शिवसेनेचे आमदार तासभर वाट पहात बसले पण भाजपचे नेते बैठकीकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे वैतागलेले आमदार तिथून निघून गेले. इकडे युतीच्या बैठकीसाठी शिवसेनेचे आमदार ताटकळत बसलेले असताना दुसरीकडे भाजपची स्वतंत्र बैठक त्यांच्या विभागीय कार्यालयात सुरू होती.

फुलंब्री तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व आणि कन्नड तालुक्यातील काही अशा एकूण 11 जागांवर भाजपने दावा सांगितल्याची विश्वसनीय सुत्रांनी माहिती दिली आहे. फुलंब्रीत शिवसेनेला एकही जागा देण्यास भाजप तयार नाही, तर दुसरीकडे कन्नडमध्ये शिवसेनेकडे असलेल्या जागांवरही भाजपने दावा सांगितल्याची माहिती आहे. शिवसेनेत फूट पडली आहे, पूर्वीसारखी पक्षाची ताकद राहिली नाही, असा दावा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काल रात्री झालेल्या बैठकीत केला होता. त्यामुळे युतीची चर्चा सकारात्मक पद्धतीने पुढे जाण्याऐवजी ती तुटण्याच्या दिशेने जात आहे.

BJP and Shiv Sena leaders amid tense negotiations over Zilla Parishad seat sharing in Chhatrapati Sambhajinagar, highlighting alliance uncertainty after BJP’s municipal election victory.
MIM Election News: महापालिका निवडणुकीतील दमदार कामगिरीनंतर 'एमआयएम'चा कॉन्फिडन्स वाढला; ZP च्या निवडणुकीबाबत नवी अपडेट समोर

महापालिका निवडणुकीत भाजपने शतप्रतिशत यश मिळवल्यानंतर जिल्हा परिषदेसाठी त्यांच्याकडे इच्छुकांच्या रांगा लागल्या आहेत. 63 जागांसाठी पक्षाकडे हजारावर अर्ज आले आहेत. अशावेळी शिवसेनेसोबत युती करण्यास ना कार्यकर्त्यांची इच्छा आहे, ना नेत्यांची. पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हवाला देत युतीसाठी चर्चा सुरू करण्यात आली आहे.

BJP and Shiv Sena leaders amid tense negotiations over Zilla Parishad seat sharing in Chhatrapati Sambhajinagar, highlighting alliance uncertainty after BJP’s municipal election victory.
Jalna Election: शिवसेना-भाजप स्वबळावर लढले, पण जालन्याच्या मतदारांची पसंती युतीलाच! रावसाहेब दानवे म्हणतात...

परंतु हा केवळ सोपस्कार आणि वरिष्ठ नेत्यांचा मान राखण्यासाठी केलेले नाटंक असल्याचे बोलले जात आहे. जिल्हा परिषदेत शिवसेना-भाजप युती होणार नाही, असा दावाही नाव न सांगण्याच्या अटीवर एकनाथ शिंदे यांच्या या पदाधिकाऱ्याने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com