Ritu Tawde Vs Kishori Pednekar : माझं माझं काय...? अडीच वर्षांचं तर हाय; पेडणेकरांनी महापौरपदाच्या कालावधीवरून रितू तावडेंची उडविली खिल्ली

Mumbai Manhole Issue : मुंबईतील मॅनहोल दुर्घटनेनंतर किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पेडणेकरांनी रितू तावडेंच्या वक्तव्यावर उपरोधिक प्रतिक्रिया देत वातावरण तापवले.
Ritu Tawade-kishori pednekar
Ritu Tawade-kishori pednekarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 03 July : मुंबईत मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप जोरात सुरू झाले आहेत. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापौर रितू तावडे यांच्या कार्यालयात जाऊन अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. महापौर तावडेंनी पेडणेकरांवर विना परवाना माझ्या कार्यालयात येऊन मोठी चूक केली आहे, असे खडसावले होते. त्यावर पेडणेकरांनी ‘माझं माझं काय...? अडीच वर्षांचं हाय’ असे सांगून रितू तावडेंची खिल्ली उडवली.

किशोर पेडणेकर यांनी महापौरांच्या कार्यालयात येऊन रेखी केली. विना परवाना माझ्या कार्यालयात येऊन पेडणेकर यांनी मोठी चूक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महापौर रितू तावडे यांनी केली होती.

माझ्या कार्यालयात यावरून पेडणेकर यांनी तावडे यांची खिल्ली उडवली आहे. पहिल्या दरवाजापासून केबिनपर्यंत महापौरांचा वावर असतो, त्यामुळे त्यांचं ते केबीन असेलही. पण तो वावर मुंबईकरांसाठी असतो, त्यामुळे तो अधिकार विरोधी पक्षनेत्यालाही असतो. त्यामुळे माझं माझंय काय आहे...अडीच वर्षांचं हाय...चांगलं काम करा, असा सल्लाही त्यांनी तावडेंना दिला.

Ritu Tawade-kishori pednekar
Gokul Election : ना महायुती, ना महाविकास आघाडी : स्थानिक राजकीय वादातून 31 संस्थांनी फिरवली ‘गोकुळ’कडे पाठ!

महापौरपदाच्या आरक्षणाचा अडीच वर्षांचा कालावधी आहे. दुसरं आरक्षण निघाल्यावर निघायचंच आहे, असे सांगून पेडणेकर यांनी माझं माझं म्हणणाऱ्या रितू तावडे यांना चांगलंच सुनावलं आहे. महापौराचं काय गोपनीय असतं, असा सवालही पेडणेकर यांनी केला.

Ritu Tawade-kishori pednekar
Tukaram Mundhe : तुकाराम मुंडेंचा दणका; दोनच दिवसांत 154 हॉटेल, रेस्टॉरंटची तपासणी, 32 परवाने रद्द, 66 जणांना नोटिसा

मी महापौरांची नाराजी बघायला बसली नाही. ज्या मुंबईकरांनी पत्रं दिली आहेत. त्या पत्रांची उकल आम्हाला हवी आहे. आमच्या पत्राला मार्चपासून उत्तरं दिली गेलेली नाहीत. नगरसेवकांच्या पत्राला जेव्हा उत्तर येत नाहीत, तेव्हा महापालिकेतील कर्मचारी हा कोणाच्या घरचा स्टाप नसतो. महापौरपदाचा मानसन्मान आम्हीही ठेवणार. पण तुमच्याकडून कामात कुचराई केली जात आहे, त्या पत्राबाबत पालिका सेक्रेटरी जे पीए म्हणून काम करतात, त्यांना याबाबत विचारलं, असेही पेडणेकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com