Vaishnavi Hagawane case : किशोरी पेडणेकरांनी रुपाली चाकणकरांना धु धू धुतले; म्हणाल्या, ‘चिल्लर अन्‌ थ्रील्लर बाई...कशाला ठेवलंय पदावर?’

Kishori Pednekar VS Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या संस्कारी आणि संवेदनशील असाव्यात, हे मात्र विद्यमान अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही.
Rupali Chakankar-Kishori Pednekar
Rupali Chakankar-Kishori Pednekar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 May : पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूपूर्वी तिची मोठी जाऊ मयुरी जगताप यांनी महिला आयोगाला सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाबाबतची तक्रार चिठ्ठी लिहून केली होती, असे तिच्या भावाने सांगितले, तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी असे कोणतही पत्र आयोगाकडे आले नसल्याचा दावा केला होता. मात्र मयुरी जगताप हिच्या भावाने ते पत्र माध्यमाला देत चाकणकरांना तोंडघशी पाडले. त्यावरून मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी चाककर यांना धू धू धुतले आहे. चिल्लर आणि थ्रीलर बाई असा उल्लेख करत पेडणेकरांनी चाकणकरांवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) म्हणाल्या, महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या संस्कारी आणि संवेदनशील असाव्यात, हे मात्र विद्यमान अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही. वैष्णवी हगवणे हिने सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. राज्यात अत्यंत वाईट घटना घडत आहेत. महिलांवर अत्याचार वाढत आहेत. पण, तेव्हा ह्या बाई शांत असतात. पक्षाच्या विरोधात काय असेल तर त्या पदर खोचून उभ्या राहतात.

वैष्णवी हगवणे हिची आत्महत्या की आणखी काही? हे तपासण्याचे काम पोलिस आपल्या तपासात करतील. पण, वैष्णवी हगवणे प्रकरणात रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) आपले असंस्कार पक्के दाखवले आहेत. लोकांना चिल्लर म्हणते. अहो चिल्लर आणि थ्रीलर ह्या बाई आहेत, असे लोक आता उघडपणे बोलत आहेत. अशा चिल्लर आणि थ्रीलर बाईला लोक हे लोक महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून ठेवत असतील तर तिच्यावर कोणाचाही दाब नसेल तर महाराष्ट्र कुठे चालला आहे, असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला.

Rupali Chakankar-Kishori Pednekar
Satara Politic's : फडणवीसांची साताऱ्यात मोठी खेळी; अजितदादांना ‘कात्रज’चा घाट दाखवत एकनाथ शिंदेंना घातली वेसन!

पेडणेकर म्हणाल्या, महाराष्ट्रातील पीडित महिलांना रुपाली चाकणकर यांच्याकडून न्याय मिळणार नाही. कारण महिला आयोगाच्या इतर सदस्या सांगत होत्या, त्या पहिले सहा, सहा महिने खुर्चीतही बसत नव्हत्या. फक्त फोन आणि ’व्हॉटस अप’वरच असायाच्या. रुपाली चाकणकरांना खुर्चीत बसायलाही वेळ मिळत नव्हता, तर त्यांना रिकाम्या करा. कशाला ठेवलं आहे, त्यांना माहिला आयोगाच्या अध्यक्षपदावर?

Rupali Chakankar-Kishori Pednekar
Rohit Pawar on Rupali Chakankar : रोहित पवार रुपाली चाकणकरांचं पदच गिळणार, आगामी अधिवेशनात करणार मोठी मागणी

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाला न्याय देणाऱ्या किती तरी महिला महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महिलांची भावना, तळमळ, आणि रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सध्या असणारा राग याचा विचार करावा. अशा बाईला पदावरून बाजूला करून सक्षम महिलेला आयोगाच्या अध्यक्षपदी बसावं, अशी मागणी किशोरी पडणेकर यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com