Kunal Kamra Controversy : "माझी औकात, मुंबईत येणार..."; कुणाल कामराने थेट मुख्यमंत्री फडणवीसांना केलं 'हे' मोठं आवाहन

Devendra Fadnavis And Kunal Kamra : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका विडंबन गीतामुळे कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच चर्चेत आला. तर शिंदेंच्या शिवसेनेने कामराने ज्या स्टुडिओमध्ये हे गीत म्हटलं होतं त्याची तोडफोड केल्यामुळे हे प्रकरण राज्यसह देशभरात चर्चेचा विषय बनलं होतं.
Devendra Fadnavis, Eknath Shinde
Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 30 May : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका विडंबन गीतामुळे कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच चर्चेत आला. तर शिंदेंच्या शिवसेनेने कामराने ज्या स्टुडिओमध्ये हे गीत म्हटलं होतं त्याची तोडफोड केल्यामुळे हे प्रकरण राज्यसह देशभरात चर्चेचा विषय बनलं होतं.

अशातच आता पुन्हा एकदा कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेत आला असून आता त्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगा असं आवाहन केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत कुणाल कामरा याच्यासह कॉमेडियन्स संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, माझ्या मते राजकीयदृष्ट्या अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं. या लोकांची औकात नाही, तुम्ही त्यांची औकात वाढवता. अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलं चांगलं.

पण भाजप आणि सहकारी पक्ष शिवसेना हे भावनिक पक्ष आहेत. त्यामुळे अशा लोकांना कधी कधी प्रतिक्रिया दिल्या जातात. मात्र, त्यांना प्रतिक्रिया मिळाल्यामुळे अशा लोकांना जास्त महत्व मिळतं. खरंतर चार लोकही अशांना ऐकत नाहीत, असं म्हणत फडणवीसांनी कुणाल कामराला टोला लगावला.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Deepak Mankar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या मुलासह इतर जणांविरोधात गुन्हा दाखल

तर फडणवीसांच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ पोस्ट करत कुणाल कामराने माझी औकात नसेल तर एकनाथ शिंदे यांना तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करायला का सांगत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. कामराने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "देवेंद्र फडणवीस तुमचं बरोबर आहे. राजकीयदृष्ट्या माझ्याकडे दुर्लक्ष करणंच चांगलं आहे.

जर माझी औकात नसेल तर तुम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडे दुर्लक्ष करायला का सांगत नाही? माझा शो चार लोकही बघत नसतील तर माझ्याकडे दुर्लक्ष का करत नाही? ऑक्टोबरमध्ये मी नाशिक, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शो घेणार आहे. तुम्ही बोलला ते खरंच होतं.

Devendra Fadnavis, Eknath Shinde
Vaishnavi Hagawane Case : हगवणे कुटुंबियांचा आणखी एक धक्कादायक कारनामा उघडकीस, चक्क पोलिसांना फसवणं आलं अंगलट

त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला माझ्याकडे दुर्लक्ष करायला सांगता आलं तर बघा.", असं म्हणत कामराने आपण महाराष्ट्रात आणि मुंबईत येणार असल्याचं सांगतच शिंदेंच्या सेनेसह भाजपला देखील आपल्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला देत एक प्रकारे डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com