Ladki Bahin Yojana : "पहिल्याच टप्प्यात 60 लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद होणार..."; 'या' नेत्याच्या दाव्यामुळे महिलांचं टेन्शन वाढलं!

Ladki Bahin Yojana Latest Update : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून ते निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे. कारण निवडणुकीपूर्वी सरसकट अर्ज केलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता.
Ladki bahin Yojna
Ladki bahin Yojna Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 14 Jan : लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) 60 लाख महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचा मोठा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे लाडक्या बहि‍णींचं टेन्शन वाढलं आहे. मात्र, राऊतांनी केलेलं वक्तव्य केवळ दिशाभूल करणारं असून ते सरकारचा भाग नाहीत.

त्यामुळे त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही, असं स्पष्टीकरण शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून ते निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरही लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आहे.

कारण निवडणुकीपूर्वी सरसकट अर्ज केलेल्या महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या योजनेसाठी अर्ज केलेल्या बहि‍णींच्या अर्जाची पडताळणी केली जाणार असल्याचं सांगितलं. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका करायला सुरूवात केली आहे.

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सर्व महिलांना पैसे दिले आणि निवडणुकीनंतर सरकार अटी आणि शर्ती लागू करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी लाडकी बहीण योजनेतील 60 लाख महिलांचे अर्ज बाद केले जाणार असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Ladki bahin Yojna
Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या भावाने टोकाची भूमिका घेताच CID ने उचललं मोठं पाऊल, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

राऊत नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीत भाजप, शिंदे गट आणि अजितदादांना मतदान व्हावं म्हणून महाराष्ट्रातल्या सरसकट साडेतीन कोटी महिलांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे दिले गेले. मात्र आता निवडणुका झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात जवळजवळ 60 लाख बहि‍णींना या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार असून त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार असल्याचं राऊत म्हणाले.

Ladki bahin Yojna
Uddhav Thackeray Shivsena : ...अन्यथा उद्धव ठाकरेंवर कोकणात कार्यकर्ते मोजण्याची वेळ येऊ शकते!

तर राऊतांच्या या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देसाई म्हणाले, "विनायक राऊत कोण आहेत? ते सरकारचा भाग आहेत का? सरकारच्या वतीने अधिकृतपणे याबाबत काही सांगितलं आहे का? तर नाही हे समाजामध्ये आणि लाडक्या बहिणींमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. यापूर्वी सुद्धा महिला बालकल्याण खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ही योजना बंद केली जाणार नाही असं स्पष्ट केलं आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com