

Lalit Patil Drugs Racket : ड्रग्ज रॅकेटप्रकरणी मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केली आहे. त्याच्या अटकेनंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर गुन्हेगार ललित पाटील हा अनेक दिवस नाशिकमध्ये होता, अशी माेठी माहिती समोर आली आहे.
गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेल्या ललित पाटील याला अखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील साकीनाका पोलिसांनी त्याला चेन्नईत अटक केली. अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील गुन्हेगार ललित पाटील हा पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांना चकवा देत पळून गेला होता. तो पळून जातानाचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले. यानंतर पोलिस आणि ससून रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावरही संशय निर्माण करण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आता ललित पाटील याच्या अटकेनंतर मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयातून पळ काढल्यानंतर गुन्हेगार ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता, अशी माहिती समोर आली आहे.
नाशिक पोलिस, पुणे पोलिस तसेच मुंबई पोलिस हे ललित पाटीलच्या मागावर होते. असे असताना ललित पाटील कित्येक दिवस नाशिकमध्येच होता, मग पोलिसांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? त्याला कुणाचे राजकीय पाठबळ होते का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पोलिस आणि तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलने नाशिकमधून धूम ठोकली. त्यानंतर तो इंदोरला गेला, मग सुरतमध्ये आणि पुन्हा नाशिक, धुळे आणि औरंगाबाद करत तो कर्नाटकमध्ये बंगळुरूत गेला.
बंगळुरूवरून चेन्नईला जात असताना साकीनाका पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली. चकवा देणारा ललित पाटील हा अखेर सापडला, पण महाराष्ट्रातून पळून जाण्यात त्याला कुणी मदत केली का? त्याला राजकीय पाठबळ मिळाले का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.