

Solapur, 23 January : नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत अपेक्षापेक्षाही चांगली कामगिरी काँग्रेस पक्षाने राज्यात केली आहे, त्यामुळे आत्मविश्वास वाढलेली काँग्रेस नव्या जोमाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणांगणात उतरली आहे. महापालिकेत चमकदार कामगिरी करणारे सतेज पाटील, अमित देशमुख यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे, डॉ. विश्वजित कदम यांच्यासह तब्बल ४० नेते झेडपीच्या प्रचाराचा धुरळा उडविणार आहेत.
राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (Congress) कमिटीने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एक माजी मुख्यमंत्री, सहा खासदार, आठ आमदार यांचा समावेश आहे.
विशेषतः महापालिका निवडणुकीत (Election) यश मिळविणारे कोल्हापुरातील आमदार सतेज पाटील, लातूरचे आमदार अमित देशमुख, यशोमती ठाकूर यांच्यासह नगरपालिकेत पश्विम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची लाज राखणारे डॉ. विश्वजित कदम यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, खासदार मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा सदस्य इम्रान प्रतापगढी, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री नसीम खान, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल यांचा समावेश आहे.
माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अमित देशमुख, आ. डॉ. विश्वजित कदम, अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार धीरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख यांच्यावरही झेडपीच्या प्रचाराची जबाबदारी असणार आहे.
अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, अक्षय राऊत व हनुमंत पवार हेही प्रचारासाठी राज्यभरात फिरणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.