Lok Sabha Electio 2024 : शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या फोडणीला बिचुकलेंच्या तेलाची धार, 'या' मतदारसंघातून भरला अर्ज

Abhijit Bichukale News : "मी रोजचे 50 आणि 1 लाख रूपयांचे काम सोडून जनतेसाठी लढत असेल, तर..", असंही बिचुकलेंनी म्हटलं.
Abhijit Bichukale
Abhijit Bichukalesarkarnama

Dombivli News : कल्याण लोकसभा निवडणूक ( Kalyan Lok Sabha Election 2024 ) दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. कल्याणध्ये शिवसेना ( शिंदे गट ) उमेदवार श्रीकांत शिंदे विरुद्ध शिवसेना ( ठाकरे गट ) उमेदवार वैशाली दरेकर ( Vaishali Darekar ) यांच्यात लढत होत आहे. यातच आता कल्याण लोकसभेत ट्विस्ट आला आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होत आहे. त्यांच्या राजकीय फोडणीला तेलाची धार द्यायला मी आलो आहे, असं बिचुकले म्हणाले. त्यामुळे शिंदे आणि दरेकर यांच्यात लढतीत बिचुकले आगीत तेल कसे टाकतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अभिजित बिचुकले ( Abhijit Bichukale ) यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी ( 3 मे ) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. "कल्याणमध्ये चुरशीची लढत अगोदरच आहे. त्यात तेल ओतायला मी आलो आहे. सातारा येथील कामगिरी पार पडल्यानंतर पुढील 13 दिवस कल्याणध्येच ठाण मांडून बसणार आहे," असं बिचुकले यांनी सांगितलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रसिद्धीसाठी आपण निवडणूक लढता, असं म्हटलं जातं, यावर बिचुकले यांनी म्हटलं, "राज्यातील 288 आमदारांपेक्षा मी नक्कीच प्रसिद्ध आहे. मला प्रसिद्धीची गरज नाही. मी जन्मापासून प्रसिद्ध आहे. मी रोजचे 50 आणि 1 लाख रूपयांचे काम सोडून जनतेसाठी लढत असेल, तर जनतेने माझ्याबरोबर आलं पाहिजे. माझ्याकडे काम आहे. मी माझ्या स्टाईलमध्ये काम करतो."

"कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे ( Shrikant Shinde ) यांनी कितीही ओरडून म्हटलं की, विकास झाला. पण, या अडीच वर्षांत काहीही विकास झालेला नाही. त्यापू्र्वी त्यांनी विकास केला असेल, तर त्यामध्ये दुमत नाही. मागील अडीच वर्षांत श्रीकांत शिंदे विरुद्ध आदित्य ठाकरे व एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे एवढ्याच लढाया होत आहेत," असं बिचुकले यांनी सांगितलं.

Abhijit Bichukale
Sanjay Nirupam News : 'भंडारा संपला, चप्पलही चोरी झाली', शिंदे गटात प्रवेश करताच संजय निरुपम असे का म्हणाले?

"कल्याणमधून अर्ज भरला, कारण मुख्यमंत्री शिंदे हे वेगवेगळ्या पद्धतीनं जनतेला भूलथापा देत आहेत, असं मला वाटतं. जनतेची कामं होत नाहीयेत. संसदेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या, असं पत्र मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं होतं. नरेंद्र मोदी छोट्या छोट्या लोकांना भेटतात. परंतु, बाबासाहेबांचं नाव संसदेला देण्यास यांचा नकार आहे का? हा माझा प्रश्न आहे. यावर पंतप्रधान मोदी यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. अटल सेतू हे नाव देण्याआधीही मी त्या सेतूला माँसाहेब जिजाऊ यांचं नावं द्या, अशी मागणी केली होती. मात्र, ते नावही देण्यात आलं नाही," असं बिचुकले यांनी म्हटलं.

"अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारलं जाणार होतं. त्या समुद्रातल्या स्मारकाचं काय झालं?," असा सवाल उपस्थित करत बिचुकले म्हणाले, "उदयनराजे यांना भाजपनं तिकीट दिलं आहे. पण, त्यांना छत्रपती असल्याचा अभिमान वाटत नाही. याच कारणांसाठी मी कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात माझी उमेदवारी घोषित करतो."

( Edited By : Akshay Sabale )

Abhijit Bichukale
Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या रमेश जाधवांचा उमेदवारी अर्ज दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com