Thackeray Vs Shinde News : मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले अन् प्रवेश केला, आदल्या दिवशी शिंदे गटात; दुसऱ्या दिवशी ठाकरे गटात परतले

Kalyan Lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदे अन् ठाकरे गटातील पदाधिकारी एकमेकांकडे घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
Purushottam Chavan
Purushottam ChavanSarkarnama

Kalyan Political News : सध्या दिवसागणिक राजकारण बदलत आहे. कोण-कोणत्या पक्षात आहे, याचा नेम राहिला नाही. आदल्या दिवशी एका पक्षात आणि सकाळपर्यंत दुसऱ्याच पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी कल्याणमध्ये पाहायला मिळाला आहे. आदल्या दिवशी ठाकरे गटाचे माजी नगरसेवकानं शिंदे गटात प्रवेश केला. पण, दुसऱ्या दिवशी ते ठाकरे गटात परतले आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Election 2024) ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर (Vaishali Darekar) विरुद्ध शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे, अशी लढत आहेत. त्यामुळे दोन्ही गटात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशासाठी चढाओढ सुरू आहे.

यातच बुधवारी (1 मे) ठाकरे गटाचे माजी नगरसेवक पुरूषोत्तम चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वैयक्तिक कामासाठी भेटायला गेले होते. त्यावेळी चव्हाण यांचा प्रवेश करून घेण्यात आला. पण, दुसऱ्या दिवशी ते ठाकरे गट परत आले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबद्दल बोलताना पुरूषोत्तम चव्हाण (Purushottam Chavan) म्हणाले, "मी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो होतो. तिथे डोबिंवलीतील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू होता. तेव्हा, माझ्याही हातात झेंडा देऊन प्रवेश करून घेण्यात आला. मी अपात्र ठरल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मला खूप मदत केली होती. त्यांच्याबरोबर चांगले संबंध असल्यानं मी तिथे गेलो होतो."

ठाकरे गटातील नेते विजय साळवी यांनी म्हटलं, "पुरूषोत्तम चव्हाण यांना तिकीट देण्यापासून निवडून आणण्यापर्यंत आम्ही परिश्रम घेतले आहेत. पण, जेव्हा चव्हाण यांच्या प्रवेशाचं वृत्त पाहिलं, तेव्हा आश्चर्यांचा धक्का बसला. त्यांनी प्रवेश का केला? हा प्रश्न मला पडला होता. मात्र, भेटून त्यांनी सांगितलं की, 'मला इकडेच राहायचं आहे, तिकडं जायचं नाही. बळजबरीनं माझ्या हातात झेंडा दिला. मी प्रवेशासाठी गेलो नव्हतो.'

Purushottam Chavan
Kalyan Loksabha News : बाळा नांदगावकराकडून खासदार शिंदेंचं कौतुक तर ठाकरे पिता-पुत्रांना चिमटा; म्हणाले...

"आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांना खासदारांच्या (श्रीकांत शिंदे) कार्यालयातून फोन येत असून वेगवेगळी आमिषे दिली जात आहेत. अशा प्रकार घडले जात असेल, तर ही निवडणूक लढणं कार्यकर्त्यांना मुश्किल होईल. सत्तेचा आणि पैशांचा माज दाखवला जात आहे. हे एकदम अयोग्य गोष्ट आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया विजय साळवी यांनी दिली आहे.

Purushottam Chavan
Eknath Shinde News : 'ठाकरेंची विकेट गेलीय, क्लिन बोल्ड', मुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com