Lok Sabha Election 2024 : ठाणेच्या उमेदवारीवरून शिंदेंचे प्रवक्ते म्हस्केंचं मोठं विधान; म्हणाले, "महायुती अजूनही..."

Thane Political News : पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही या वेळी म्हस्के यांनी जाहीर केले.
Lok Sabha Election 2024 Thane Political News Thane News
Lok Sabha Election 2024 Thane Political News Thane Newssarkarnama
Published on
Updated on

Thane News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. त्यातच महायुतीच्या तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यातून तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची नावे पुढे येत असताना, शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावे चर्चेत नसल्याचे स्पष्टीकरण देत, या मतदारसंघात वरिष्ठ नेते जो उमेदवार देतील, त्याचे काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. (Lok Sabha Election 2024)

आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून आपापल्या पद्धतीने दावे दाखल केले गेले. त्यातूनच भाजपकडून माजी खासदार संजीव नाईक, विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर तर शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून(अजित पवार) माजी खासदार आनंद परांजपे यांची नावे इच्छुकांच्या यादीत पुढे येत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत म्हस्के यांना विचारले असता, महायुतीत सध्यातरी कुठली ही नावे चर्चेत नाहीत. कुठल्याही पक्षाचा उमेदवार जाहीर होईल, त्यावेळी तो आपला उमेदवार-आमचा उमेदवार असणार आहे. अशा पद्धतीने ठाणे लोकसभा मतदारसंघात आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे हा इच्छुक, तो इच्छुक, मी इच्छुक असे काही नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्ही मान्य करून काम करणार आहोत, असेही म्हस्के यांनी या वेळी स्पष्ट केले. '' (Latest Marathi News)

म्हस्के म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknat Shidne) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना जो शब्द दिला आहे. तो म्हणजे महाराष्ट्रात 48 जागा निवडून आणण्याचा, तो शब्द आम्ही पाळणार आहोत. यासाठी दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. या वेळी पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचेही म्हस्के यांनी जाहीर केले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com