Mumbai News : गुजराती सोसायटीत मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास मज्जाव, ठाकरे गटाचा आरोप; नेमकं घडलं काय?

Gujarati Vs Marathi In Mumbai : मुंबईत मराठी माणसाला नोकरी देणार नाही, अशी जाहीरात एका कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आली असतानाचा हा वाद समोर आला आहे.
Gujarati Vs Marathi
Gujarati Vs Marathisarkarnama

Mumbai News, 6 May : मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी ( Lok Sabha Election 2024 ) पाचव्या टप्प्यात अर्थात 20 मेला मतदान पार पडणार आहे. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या तोफा धडाडत असून, 'होम टू होम', असा प्रचार सर्वपक्षीयांकडून करण्यात येत आहे. यातच मुंबईत पुन्हा मराठी विरुद्ध गुजराती या वादाला तोंड फुटलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) उमेदवार संजय दिना पाटील यांचा प्रचार करण्यास एका गुजराती बहुल सोसायटीनं मज्जाव केल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

ईशान्य मुंबई शिवसेनेचे ( ठाकरे गट ) उमेदवार संजय दिना पाटील ( Sanjay Dina Patil ) विरुद्ध भाजपचे मिहीर कोटेचा ( mihir Kotecha ) यांच्यात सामना रंगला आहे. संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून घाटकोपर परिसरात प्रचार करण्यात येत आहे. यातच ठाकरे गटाचे कार्यकर्ते रविवारी ( 5 मे ) घाटकोपरमधील गुजराती बहुल असलेल्या एका सोसायटीत प्रचारासाठी गेले होते. पण, संजय दिना पाटील यांचे पॅम्प्लेट्स वाटण्यास मज्जाव करण्यात आला. उलट मिहीर कोटेचा यांचे पॅम्प्लेट्स सोसायटीत वाटण्यात आल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच, याप्रकरणाबद्दल संतप्त प्रतिक्रियाही उमटत आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती, असा वाद रंगताना दिसत आहे.

यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. "घाटकोरपमधील एका सोसायटीत शिवसैनिकांना मराठी असल्यामुळे येण्यास मज्जाव केला. आता *****ट शिवसेना काय करत आहे? शिवसेना फडणवीस गट ही ****ची सेना आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं आव्हान स्वीकारलं आहे. आम्ही लढू आणि लढणारच... पण, आमची शिवसेना खरी म्हणणारे ****ट याप्रकरणावर काय बोलतात, हे स्पष्ट व्हायला पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

Gujarati Vs Marathi
Lok Sabha Election 2024 : अखेर भाजपने पालघरची जागा शिवसेनेकडून खेचली

दरम्यान, महाराष्ट्रात मराठी तरुण - तरुणींना नोकरी नाकारत असल्याचे वास्तव समोर आले आहे. ‘मराठी लोकांना इथे स्थान नाही’; असे एका नोकरीच्या जाहिरातीत म्हटल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. गुजरातमधील एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरसाठीच्या मुंबईतील नोकरीची जाहिरात तिच्या लिंक्डइन खात्यावर पोस्ट केली होती, परंतु सदर जाहिरातीत ‘मराठी लोकांचे इथे स्वागत नाही’ असा मजकूर लिहिल्याने नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Gujarati Vs Marathi
Sanjay Nirupam News : 'भंडारा संपला, चप्पलही चोरी झाली', शिंदे गटात प्रवेश करताच संजय निरुपम असे का म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com