Lok Sabha Election 2024: निवडणुकीनंतर सुपारी शॉप बंद होणार, राऊतांच्या निशाण्यावर कोण?

Sanjay Raut News: "महाराष्ट्रात येऊन जितक्या सभा घेतल्या जातील, तितकीच त्यांची वाट लागणार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन सभा घेतायत याचा अर्थ तुम्ही मागील 10 वर्षात काहीच केलं नाही."
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut On Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचारादरम्यान अनेक नेते विरोधकांवर टीका करताना दिसत आहेत. अशातच आता महायुतीला पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डिवचलं आहे. "महाराष्ट्रात काही सुपारी बहाद्दरांची दुकाने आहेत. ही दुकाने बंद होणार असून राज ठाकरे यांचंही एक दुकान त्यामध्ये आहे." असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महाराष्ट्रात काही सुपारी बहाद्दरांची दुकाने आहेत. मात्र, ती लवकरच बंद होणार असून राज ठाकरे यांचंही एक दुकान त्यामध्ये आहे. तसेच तीन चार सुपारी शॉप इन पॉलिटिक्स बंद होणार असल्याचंही राऊत यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्रात येऊन जितक्या सभा घेतल्या जातील, तितकीच त्यांची वाट लागणार आहे, अशी टीका त्यांनी महायुतीवर केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबईत येऊन सभा घेतायत याचा अर्थ तुम्ही मागील 10 वर्षात काहीच केलं नाही. त्यामुळेच तुम्हाला महाराष्ट्रात सभा घ्याव्या लागत आहेत, असा हल्लाबोल राऊतांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊतांनी यावेळी राज ठाकरेंच्या भूमिकेवरून बोचरी टीका केली. ते म्हणाले, ज्यांनी तुम्हाला शिव्या घातल्या, त्यांनाच तुम्हाला मांडीवर घेऊन बसावं लागत आहे. राज ठाकरे ज्यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित करतात त्यांच्याबरोबरच ते जातात, ही त्यांची खासियत आहे, असं म्हणत राऊतांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Sanjay Raut
VBA News : 'वंचित'च्या पदाधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

राऊत यांनी आजच्या महाविकास आघाडीच्या सभेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, "आज मुंबईत आघाडीची सभा आहे, ही सभा शिवाजी पार्कवर व्हावी यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज केला होता. मात्र, आमची सभा होऊ नये म्हणून पंतप्रधान आणि सुपारीबाज बोलवण्यात आले. सत्तेच गैरवापर करण्यात आला." तसेच भाजपने सर्वात जास्त बहुमताचा गैरवापर केला असून, त्यांनी या राक्षसी बहुमताचा त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला देशासाठी नव्हे, असा घणाघातही राऊत यांनी यावेळी केला.

(Edited By Jagdish Patil)

Sanjay Raut
Neelam Gorhe News : नीलम गोऱ्हे यांची विरोधकांच्या भूमिकेला अप्रत्यक्ष सहमती; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com