Uddhav Thackeray News : "मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं, आता...", उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray On Modi, Shah : "दिल्लीतल्या दोन खेचरांना कायमचे पाणी पाजू", असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 12 May : आता निवडणूक ही महाभारतासारखी चालली आहे. त्यावेळी महाराभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. यावेळेला आपल्या देशातील लोकशाहीचं वस्त्रहरण होतं आहे. त्यामुळे ही लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे. स्वातंत्र्यलढा हा एक वेगळा भाग होता. त्याकाळात आपण नव्हतो. ज्यांनी-ज्यांनी संघर्ष केला, बलिदान दिलं त्या सर्व क्रांतिवीरांनी आणि त्याग करणाऱ्या सगळ्या स्वातंत्र्यसैनिकांनी अपार कष्ट करून, शौर्य गाजवून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे स्वातंत्र्य टिकवण्याचं काम आपण केलंच पाहिजे, असा निर्धार शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी 'सामना' वृत्तपत्राला मुलाखत दिली. तेव्हा, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah ) आणि भाजपवर ( Bjp ) निशाणा साधला. "दिल्लीतल्या दोन खेचरांना महाराष्ट्रातील पाण्यात फक्त पवार-ठाकरेच दिसत आहेत. आम्ही त्या खेचरांना कायमचे पाणी पाजू. मोदींना आतापर्यंत महाराष्ट्राचे प्रेम मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो ते अनुभवा," असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"उत्तर प्रदेशात गंगेत प्रेतं वाहत होती. गुजरातमध्ये सामूहिक चिता पेटल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये, असं कधी घडलं नव्हतं. त्या वेळेला मोदी रिकाम्या थाळय़ा वाजवत होते. दिवे लावा, दिवे विझवा, कोलांटउड्या मारा, बेडूकउड्या मारा, उठा-बशा काढा… याने कोरोना जात नाही. कोरोना यामुळे नाही गेला. मला एका गोष्टीचं समाधान आहे. महाराष्ट्राच्या जनतेला मी जे जे काय सांगत गेलो, ते ते ती ऐकत गेली. त्यांच्यात मी कुठेही भेदभाव केला नाही," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : ... तर मीही मोदीजी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन; धाराशिवमधून उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

"गुजरातबद्दलदेखील माझ्या मनात काही आकस नाहीये. गुजरातही आमचाच आहे; पण हाच भाव गुजराती माता, बंधू-भगिनींनीही ठेवलाच पाहिजे. जे इथे राहतात. उलट 92-93 साली शिवसेनेनेच त्यांना वाचवलं. मोदी त्यावेळी कुठे होते?" असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : 'मोदी सरकार नाही गजनी सरकार', उद्धव ठाकरेंनी ठणकावले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com