Uddhav Thackeray News : 'मोदी सरकार नाही गजनी सरकार', उद्धव ठाकरेंनी ठणकावले

Narendra Modi : मै अकेला सबपे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी, हीच मोदींची नीती आहे. पक्ष चोरले,माझा पक्ष गद्दारांच्या हातात दिला. मोदी आत्मावर बोलतात. तुमच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यावर बोला.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Loksabha Election : हातकणंगले मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीची Maha Vikas Aghadi जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलीत पंतप्रधान मोदींचा खरपूस समचार घेतला. आश्वासन देऊन विसरणारे सरकार हे मोदी सरकार नाही तर गजनी सरकार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray News : 'मी सूड घ्यायला आलो आहे', उद्धव ठाकरे कडाडले

' खरे तर हे मोदी सरकार नाही हे गजनी सरकार आहे. त्यांनी काल काय आश्वासन दिले ते यांना आज आठवत नाही. 2014 काय बोलले ते त्यांना 2019 ला आठवत नाही. आणि 2019 ला काय बोलले ते 2024 ला आठवत नाही. आता उद्या लोक यांना विसरणार आहेत.', असा टोला उद्धव Uddhav Thackeray ठाकरेंनी लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तुम्हाला राजकारणामुळे मुलं होत नाहीत. तुम्ही आमच्यातले चोरून घेऊन जाता. त्यातले गद्दार चोरून तुम्हाला राजकारण करावे लागते, हे आमचे यश आणि तुमचा अपयश आहे. तुम्ही गद्दार चोरलेत पण जनता माझ्यासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले.

मै अकेला सबपे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी, हीच मोदींची नीती आहे. पक्ष चोरले,माझा पक्ष गद्दारांच्या हातात दिला. मोदी आत्मावर बोलतात. तुमच्या काळात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यावर बोला. मोदी धाराशिवला गेले पण तुळजापुरच्या मंदिरात का नाही गेले, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Uddhav Thackeray
Maval Lok Sabha Constituency : भाजपचा मित्रपक्षांवर भरवसा नाय का? शिवसेना उमेदवार असलेल्या मावळात दिल्लीतून आले खास पथक!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com