Uddhav Thackray News : नाही.. नाही म्हणत शिंदे गटात जाऊन उमेदवारीही मिळवलेल्या वायकरांवर ठाकरेंचा तिखट वार

Uddhav Thackeray On Rss : भाजप 'आरएसएस'वर सुद्धा बंदी आणेल, अशीच लक्षणं दिसत आहे, असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
uddhav thackeray ravindra waikar
uddhav thackeray ravindra waikarsarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News, 18 May : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ ( Mumbai North West ) सुरूवातीपासून चर्चेचा विषय ठरला आहे. शिवसेनेनं ( ठाकरे गट ) निवडणुकीपूर्वीच 9 मार्चला सध्या शिवसेनेत असलेले गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar ) यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरे गटातून आयात केलेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली. यातच शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच रवींद्र वायकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

रवींद्र वायकर ( Ravindra Waikar ) यांच्यावर जोगेश्वरी येथे पंचतारित हॉटेलच्या इमारतीशी संबंधित गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप भाजपकडून ( Bjp ) करण्यात येत होता. वायकर यांची ईडीची चौकशी सुरु होती. पण, शिवसेनेच्या फुटीनंतर ठाकरेंबरोबर खांद्याला खांदा लावून उभा राहिलेल्या वायकर यांनी अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) एका शब्दानेही रवींद्र वायकर यांच्यावर टीका केली नव्हती. मात्र, पहिल्यांदाच ठाकरेंनी वायकर यांचा 'गद्दार' म्हणून उल्लेख केला आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे म्हणाले, "रवींद्र वायकर यांचं उत्तर-पश्चिम मतदारसंघात आव्हान वाटत नाही. ते गद्दार आहेत. जोगेश्वर आणि गोरेगावमधील मतदारसंघ शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. येथील जनतेला गद्दारीचा राग आलाय. रवींद्र वायकर यांनी भ्रष्टाचाराची कबुली दिलीय. त्यांच्यासमोर दोनच पर्याय असल्याचं वायकर यांनी सांगितलं होतं. पण, अमोल कीर्तिकर घाबरले नाहीत. ते ताठ मानेने उभे आहेत. त्यामुळे जनतेला लढणारा माणूस पाहिजे."

uddhav thackeray ravindra waikar
Uddhav Thackeray News : नरेंद्र मोदी शब्दांचे पक्के, पण...; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

ऐन निवडणुकीच्या काळात अमोल कीर्तिकरांवर ईडीनं कारवाईचा फास आवळल्याचं दिसलं. याबद्दल प्रश्न विचारल्यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं, "हे चार जूनपर्यंत चालेलं. नंतर हा फास तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजप जिंकणार सुद्धा नाही. मात्र, भाजप 'आरएसएस'वर सुद्धा बंदी आणेल, अशीच लक्षणं दिसत आहे. वल्लभभाई पटेल यांच्यानंतर भाजप आणि मोदी 'आरएसएस'वर बंदी आणतील."

uddhav thackeray ravindra waikar
Uddhav Thackeray News : "...तर नरेंद्र मोदींचा उदयच झाला नसता"; उद्धव ठाकरेंनी काढली प्रमोद महाजनांची आठवण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com