Congress News : ...म्हणून शरद पवार दहा वर्षांनी, तर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच येणार काँग्रेस भवनात

Sharad Pawar News : यापूर्वी 2014 मध्ये शरद पवार काँग्रेस भवनात आले होते.
sharad pawar Aaditya thackeray
sharad pawar Aaditya thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सक्रिय झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर 24 फेब्रुवारीला पुण्यातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले जाणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांची काँग्रेस भवनासमोर सभा पार पडणार आहे.

sharad pawar Aaditya thackeray
Eknath Shinde : "श्रीकांतचं भाषण संपताच त्याच्या अन् माझ्या डोळ्यांत अश्रू, शिवसेना कुटुंबही...", मुख्यमंत्र्यांचं भावनिक ट्विट

महाविकास आघाडीनं पुण्यात 24 फेब्रुवारीला मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्याला शरद पवार ( Sharad Pawar ), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आदित्य ठाकरे संबोधित करणार आहेत. एक प्रकारे महाविकास आघाडी या मेळाव्याच्या माध्यमातून लोकसभेचं रणशिंग फुंकणार आहे. तसेच, मेळाव्याच्या निमित्तानं महाविकास आघाडीकडून शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ( Pune Loksabha Constituency ) महाविकास आघाडीकडून तिन्ही पक्ष इच्छुक आहेत. पुणे हा पारंपरिकपणे काँग्रेसचा मतदारसंघ आहे. पण, राष्ट्रवादीकडून वारंवार या जागेवर दावा सांगण्यात येत आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडूनही पुणे लोकसभा मतदारसंघाची मागणी केली आहे. अशातच, मेळाव्याच्या माध्यमातून पुण्याची जागा कोण लढणार? यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिरूर, बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघांसाठी होणारा हा पहिलाच मेळावा काँग्रेस भवनच्या परिसरात होणार आहे. काँग्रेस भवन या परिसरात अनेक ऐतिहासिक मेळावे यापूर्वी झाले आहेत. शरद पवार हे तब्बल दहा वर्षांनंतर काँग्रेस भवनाच्या पुढील मैदानात सभा घेणार आहेत, तर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेस भवनाच्या मैदानातील सभेला हजेरी लावणार आहेत.

sharad pawar Aaditya thackeray
Milind Deora : काँग्रेस सोडण्यामागं नेमकं कारण काय? मिलिंद देवरा म्हणाले, "तो एक..."

यापूर्वी शरद पवारांनी 2014 मध्ये काँग्रेस भवनाच्या समोर झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित केलं होतं. तसेच, मागील वर्षी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त काँग्रेस भवनात पवारांनीही हजेरी लावली होती. शरद पवार 10 वर्षांनी आणि आदित्य ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेस भवनात येणार असल्यानं ही सभा ऐतिहासिक ठरणार असल्याचं बोललं जात आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

sharad pawar Aaditya thackeray
Sharad Pawar News : शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला गुरुमंत्र, 'अनुकूल वातावरण...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com