Sheetal Mhatre On Sharad Pawar : 'सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा', शीतल म्हात्रेंचे शरद पवारांना सडेतोड उत्तर

Loksabha Election 2024 : शरद पवार म्हणाले, अजितदादा बोलले ते खरेच आहे, त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण मुद्दा असा आहे, की मूळ पवार की बाहेरून आलेले पवार!
 Sharad Pawar sheetal mhatre
Sharad Pawar sheetal mhatre sarkarnama
Published on
Updated on

Sheetal Mhatre News : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांची लढत होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराच्या दरम्यान सुप्रिया सुळेंना लक्ष्य करताना बारामतीकरांनी यंदाही पवार आडनावाला मदत केली तर आपण सर्वजण खूष राहू, असे आवाहन करत पवार आडनावाला निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यावर शरद पवारांनी मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असे म्हणत सडेतोड उत्तर दिले होते. शरद पवारांच्या या उत्तरावर शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी आक्षेप घेतला.

 Sharad Pawar sheetal mhatre
Rohit Pawar News : रोहित पवारांचे अजितदादांना ओपन चॅलेंज; म्हणाले...

शरद पवार म्हणाले, अजितदादा (Ajit Pawar) बोलले ते खरेच आहे, त्यात चुकीचे असे काहीच नाही. पण मुद्दा असा आहे, की मूळ पवार की बाहेरून आलेले पवार! असे म्हणत पवारांनी अप्रत्यक्षपणे बारामतीकरांनी मूळ पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा द्यावा, असे सूचित केले होते. मात्र, हाच मुद्दा पकडून शरद पवार (Sharad Pawar) यांचे हे वाक्य म्हणजे महाराष्ट्रातील सासरी गेलेल्या सुनांचा अपमान आहे, अशी टीका शीतल म्हात्रेंनी केली.

‘सुनांना लेकीसारखी वागणूक देण्याची परंपरा आहे आमच्या महाराष्ट्रात… कदाचित मुलीच्या प्रेमापोटी, तुम्ही राजकारणासाठी तुमचे विचार बदलले… बारामतीच्या काकांचं हे वाक्य, ‘महाराष्ट्रातल्या समस्त लग्न करून सासरी गेलेल्या सुनांचा अपमान’ आहे, असं ट्विट करत शीतल म्हात्रे यांनी करत शरद पवारांवर टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवार मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार म्हटले होते. त्यावरून 'बाहेरून' आलेल्या सावित्री माई ज्योतिबांसोबत समाजकारणात उभ्या राहिल्या...'बाहेरून' आलेल्या येसूबाई, ताराराणी यांच्यासारख्या सुना स्वराज्यासाठी झगडल्या...अहो रमाईच्या संसारातल्या त्यागाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे पुरुष घडत असतात.., असा ट्विटमध्ये उल्लेख म्हात्रे यांनी केला आहे.

R

 Sharad Pawar sheetal mhatre
Lok Sabha Election 2024 : मोहिते-पाटील तुमच्याविरोधात माढ्यातून लोकसभा लढविणार; निंबाळकर म्हणाले, कुणीतरी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com