Mns VS Eknath Shinde : "मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं, पण दाढीवाल्यांची मदत करणं योग्य नाही", मनसेची बोचरी टीका

Prakash Mahajan On Bjp : संघ आणि भाजपच्या संबंधांवर मनसेनं बोलणं योग्य नाही. संघ जर टीका करत असेल तर अन्य कोणी भाजपवर बोलण्याची गरज नाही, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं.
raj thackeray | eknath shinde
raj thackeray | eknath shindesarkarnama

राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरून राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून शिंदे-फडणवीस-पवार सरकारला लक्ष्य केलं जात आहे. यातच मनसेचे नेते, प्रकाश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं आहे. पण, दाढीवाल्यांची मदत करणं योग्य नाही, अशी टीका प्रकाश महाजन यांनी केली आहे.

सरकारनं वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचा मनसे जाहीर निषेध करते. लोकसभा निवडणुकीत मते मिळाली नाहीत, म्हणून राज्य सरकारकडून अल्पसंख्याक समाजाचे लांगूलचालन केले जात असेल, तर ते योग्य नाही, अशा शब्दांत महाजन यांनी खडसावलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

"देशाचे कायदे बोर्डाला लागू होत नाहीत"

प्रकाश महाजन ( Prakash Mahajan ) म्हणाले, "वक्फ बोर्ड ही घटनाबाह्य संस्था आहे. वक्फ बोर्ड एकप्रकारे रद्द करायला पाहिजे. या देशाचे कायदे या बोर्डाला लागू होत नाहीत. बोर्डानं एकप्रकारे एखाद्या जमिनीवर दावा सांगितला, तर त्या संबंधित व्यक्ती न्यायालयात जात येत नाही. वक्फ बोर्डाकडे जावं लागतं."

raj thackeray | eknath shinde
BJP Politics : भाजप विधानसभा स्वबळावर लढणार? शिंदे, पवारांना दूर ठेवण्याची तयारी...

"...तर बोर्डच रद्द झाला असता"

"नरेंद्र मोदी यांना लोकसभेत पुरेसं पाठबळ जनतेनं दिलं नाही. अन्यथा हा वक्फ बोर्डच रद्द करण्यात आला असता," असं प्रकाश महाजन यांनी सांगितलं.

"सरकार हिंदूंची वळकटी करणार का?"

"भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात वक्फ बोर्डाची बळकटी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पण, हे सरकार हिंदूंची वळकटी करणार का? मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवणं चांगलं आहे. मात्र, दाढी वाल्यांना मदत करणं योग्य नाही," असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं.

raj thackeray | eknath shinde
Video Chhagan Bhujbal: भुजबळांना विधानसभेची लईच घाई; लहान भाऊ, मोठा भाऊ कोण ते लवकर ठरवा!

"भाजप अन् संघावर बोलणं योग्य नाही"

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'ऑर्गनायझर' मुखपत्रातून भाजपला खडे बोल सुनावण्यात आलं होतं. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. याबद्दल प्रकाश महाजन यांना विचारला असता, ते म्हणाले, "संघ आणि भाजपच्या संबंधांवर मनसेनं बोलणं योग्य नाही. संघ जर टीका करत असेल तर अन्य कोणी भाजपवर बोलण्याची गरज नाही. संघानं भाजपला सल्ला दिला असेल, तर तो सल्ला नसतो आदेश असतो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com