
1.महायुतीत असंतोषाचे वादळ: महादेव जानकर यांनी भाजपसोबत युती करणे ही चूक होती असे म्हणत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली; भाजपविरोधात नवे समीकरण तयार होण्याचे संकेत.
2.स्थानिक निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी: रासपने राज्यभर दौरे व मेळाव्यांच्या माध्यमातून तयारी सुरू केली असून, कुठेही आघाडी झाली नाही तर स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला.
3.2029 च्या लोकसभा निवडणुकीचं लक्ष्य: जानकर यांनी केंद्रात मंत्री होण्याचे ध्येय जाहीर केले असून, राजू शेट्टी, बच्चू कडू आदींसोबत नवी राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू.
Akola News : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसून येत आहे. सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बुधवारी (ता.30) अचानक राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची भेट घेतल्यानंतर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत तळ ठोकून असून मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीची सह्याद्रीवर खलबतं सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.यातच आता महायुतीतील जुन्या मित्रपक्षाच्या नेत्यानं धक्कादायक विधान केलं आहे. (RSP leader Mahadev Jankar terms alliance with BJP his biggest political mistake and signals a shift by attending Uddhav and Raj Thackeray's rally amid major political realignment in Maharashtra)
एकीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंसह शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांवर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फक्त 'वॉर्निंग' देत आणखी एक संधी दिल्याची चर्चा आहे. याचदरम्यान, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भाजपसोबत युती करणं,ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, असं विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासप नेते महादेव जानकर हेही आता अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यांनी राज्यभरातील दौरे, भेटी-गाठी, बैठका,मेळावे यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. अकोल्यातून मीडियाशी संवाद साधताना ते भाजपवर तुटून पडले.
महादेव जानकर म्हणाले, येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रासप ज्याठिकाणी आघाडी होईल तिथे आघाडी, नाहीतर स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. याचवेळी त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही कुणाशीही युती करायला तयार असल्याचा दावाही केला आहे.
येत्या काळात फक्त भाजपला पराभूत साठी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,यांच्यासह कोणत्याही राजकीय पक्षाशी आम्ही आघाडी करण्यास तयार असल्याचे संकेतही जानकरांनी दिले आहेत.
रासपच्या महादेव जानकरांनी यावेळी भाजपसोबत युती करणं ही माझ्या राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. आता आम्ही कुणाशीही युती करू, पण भाजपला पराभूत करणारच असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे. तसेच 2029 मध्ये लोकसभेची निवडणूक लढणार असून, केंद्र सरकारमध्ये मंत्री होणं हेच आमचं पुढचं लक्ष्य असल्याचंही ठणकावलं आहे.
आत्तापासूनच महादेव जानकरांनी रासपनं 2029 च्या लोकसभा निवडणुकीचीही तयारीही सुरू केली असल्याची माहितीही दिली आहे. आम्ही आता केवळ केंद्राच्या राजकारणात राहणार आहोत. 2029 ला लोकसभा लढणार असून, यापुढे केंद्रातच मंत्री होणार, हा माझा विश्वास आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी त्यांनी राज्यातील नव्या आघाडीचे संकेत देतानाच पुन्हा एकदा राजू शेट्टी, बच्चू कडू, शेतकरी कामगार पक्ष आणि रविकांत तुपकर यांच्यासह राजकीय मोट बांधणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यांनी यावेळी समन्वय साधून मोठा पर्याय उभा करायचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील प्रामाणिक, शेतकरीहिताचे आणि परिवर्तनवादी नेतृत्व एकत्र आणायचं ध्येय असल्याचंही बोलून दाखवलं आहे.
महादेव जानकर यांनी भाजपविषयी काय विधान केलं?
त्यांनी भाजपसोबत युती करणे ही राजकीय आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचं म्हटलं.
रासप स्थानिक निवडणुकीसाठी काय भूमिका घेत आहे?
आघाडी शक्य नसेल तर रासप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे.
2029 साठी जानकर यांची काय रणनीती आहे?
त्यांनी लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री होण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
नव्या आघाडीच्या प्रयत्नात कोणते नेते सामील होणार आहेत?
राजू शेट्टी, बच्चू कडू, शेकाप व रविकांत तुपकर यांच्यासोबत नवा पर्याय उभारण्याचा विचार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.