Pune Rave Party: पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी वकिलाचा खळबळजनक दावा, म्हणाले, 'जप्त केलेले कोकेन...', खडसेंच्या जावयाचा जामीन निश्चित?

Adv Vijaysinh Thombare Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे यांनी दावा केला की, प्रांजल खेवलकर यांनी कोणतेही अंमली पदार्थ घेतले नाहीत आणि त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे.
Pune Rave Party Raid
Pune Rave Party RaidSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील खराडी येथील बहुचर्चित रेव्ह पार्टी प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केल्यानंतर या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट देत प्रांजल खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी एक धक्कादायक दावा केला आहे.

प्रांजल खेवलकरसह सर्व सात आरोपींची दोन दिवसांची पोलिस कोठडी आज (गुरुवारी) संपत आहे. दुपारनंतर त्यांना पुन्हा शिवाजीनगर कोर्टात हजर केले जाणार आहे. पोलिस कोठडीत वाढ मिळावी यासाठी पोलिस युक्तिवाद करतील, तर आरोपींचे वकील जामिनासाठी प्रयत्न करणार आहेत. या सुनावणी पूर्वी वकिलांनी केलेल्या दाव्यामुळे आणि रक्त तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेल्या निकालामुळे कोर्टात या प्रकरणाला नवीन वळण देऊ शकतो.

याबाबत खेवलकर यांचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी माध्यमांशी बोलताना सनसनाटी दावा केला की, 'पोलिसांनी रेव्ह पार्टीदरम्यान जप्त केलेला आणि कोकेन म्हणून वजन केलेला पदार्थ हा खरंतर कोकेन नव्हताच. तसेच प्रांजल खेवलकर यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे.'

Pune Rave Party Raid
Devendra Fadnavis : मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची एकाच वाक्यात प्रतिक्रिया ; म्हणाले, आतंकवाद भगवा न कभी..

एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी ही कारवाईला राजकीय षडयंत्र असल्याचा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. खडसे यांनी दावा केला आहे की, प्रांजल खेवलकर यांनी कोणतेही अमली पदार्थ घेतले नाहीत आणि त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. रोहिणी खडसे स्वत: वकील असल्याने त्यांनी पतीच्या बचावासाठी कोर्टात हजेरी लावली आहे. तसेच, त्यांनी प्रांजल यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती गैरमार्गाने विरोधी आमदाराकडे गेल्याचा आरोप करत पुणे पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या पदार्थांचा रासायनिक अहवाल आणि रक्त तपासणी अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर वकिलांचा दावा खरा ठरला आणि जप्त केलेला पदार्थ कोकेन नसल्याचे सिद्ध झाले, तर हे प्रकरण कमकुवत होऊन आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता वाढेल असं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

Pune Rave Party Raid
Devendra Fadnavis warning : देवेंद्र फडणवीसांचा शेवटचा इशारा पण वादग्रस्त मंत्री सुधारणार का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com