Mahanand in Gujarat : महाराष्ट्राची ओळख ‘महानंद’ गुजरातला? संजय राऊतांनी शिंदे सरकारला घेरलं

Sanjay Raut : संजय राऊत यांनी गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.
Mahanand Issue I Sanajay Raut
Mahanand Issue I Sanajay RautSarkarnama
Published on
Updated on

भाग्यश्री प्रधान आचार्य

Mumbai News : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच महानंदचे नियंत्रण गुजरातमधील नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाकडे जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावरून पुन्हा एकदा राज्य सरकार आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले आहेत. शिवेसना (उध्दव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधत महानंदला गुजरातला नेण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून अनेक प्रकल्प गुजरातला (Gujarat) जात असल्याचे आरोप विरोधकांकडून सातत्याने केले जात आहेत. त्यात आता महानंदची (Mahanand) भर पडली आहे. महानंद डेअरीचे नियंत्रण व संचलन गुजरातमधील बोर्डाकडे देण्याची शिफारस करण्यात आल्याचे समजते.

Mahanand Issue I Sanajay Raut
Adani-Hindenburg Case : सुप्रीम कोर्टाचा अदानींना मोठा दिलासा; तीन महिन्यांत तपास पूर्ण करण्याचे ‘सेबी’ला आदेश

मीडियाशी बोलताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, महानंदा डेअरीच्या रुपात गुजरातला आणखी एक महत्त्वाचा उद्योग नेण्याचा डाव आज उघड झाला आहे. महानंदा ही महाराष्ट्राची ओळख आहे. महानंदा गुजरातला नेण्याचा प्रयत्न केला तर शिवसेना (Shiv Sena) (उबाठा गट) गप्प बसणार नाही. रोज एक व्यवसाय गुजरातला खेचून नेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात धृतराष्ट्राचे सरकार तयार झाले आहे, असे ते म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घटक पक्षांची चर्चा सुरू

काँग्रेसवर फार भार न टाकता इंडिया आघाडीचे संघटन बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे, ही शिवसेना (उबाठा) गटाची भूमिका आहे त्यासाठीच नितीश कुमार आणि उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. इंडिया आघाडी मध्ये काँग्रेस शिवाय जे काही घटक पक्ष आहेत. त्या सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Mahanand Issue I Sanajay Raut
Kolhapur Politics : महाडिकांनी पुन्हा सतेज पाटलांना डिवचलं; म्हणाले, त्यांच्याकडे बंगाली बाबा...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे संबोधित करणार...

आज दुपारी आझाद मैदान येथे अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा आहे. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून उधव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यात लक्ष घालण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कोविडमुळे फार काही करता आले नाही. आज उद्धव ठाकरे स्वतः आझाद मैदान येथे जाऊन त्यांना संबोधित करतील, अशी माहिती राऊतांनी दिली.

रेसकोर्स जमिनीवर राज्य सरकारचा डोळा...

महालक्ष्मी रेसकोर्स जमिनीवर राज्य सरकारचा डोळा असल्याच्या आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तो अत्यंत धक्कादायक असून संपूर्ण महाराष्ट्र मुंबई लुटण्याचा आणि ती बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे. ते आम्ही होऊ देणार नाही, असे राऊत म्हणाले.

(Edited By - Rajanand More)

Mahanand Issue I Sanajay Raut
Shinde VS Thackeray: ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंनी स्वीकारलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com