Shinde VS Thackeray: ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री शिंदेंनी स्वीकारलं

Eknath Shinde VS Uddhav Thackeray: शिरूर, मावळमध्ये प्रचार सभा घेत झंझावाती दौऱ्याला 6 जानेवारीपासून होणार सुरूवात
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर संजोग वाघेरे यांचे पक्षात स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी 'शिवरायांच्या पुण्यात गद्दारांना गाडा' असे आदेश पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिले. ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाला प्रत्युत्तर देण्याचा चंग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधला आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रात 'मिशन 48' ची सुरूवात पुण्यापासून करण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे.

यासाठी 'शिवसंकल्प अभियान' हाती घेण्यात आले आहे. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून या अभियानाची सुरुवात होणार असून या अभियानाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीचा 'श्री गणेशा' केला जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री शिंदे येत्या शनिवारी (6 जानेवारी) मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येऊन जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Jitendra Awhad: '...तेव्हा अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं ही आमची चूकच' ः जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

राज्यात सत्ताधारी असलेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने केलेल्या कामांच्या जोरावर मते मागण्याचा निर्धार मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात 'मिशन 48'ची सुरूवात करण्यासाठी 'शिवसंकल्प अभियान' हाती घेतले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे स्वतः 'शिवसंकल्प अभियाना'द्वारे राज्यभरामध्ये सर्व ठिकाणी प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

यासाठी राज्यभर प्रचार मेळावे घेतले जाणार आहेत. शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्व दूर आहे. हे दोघे एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही नामीसंधी सोडत नाहीत. काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद वाढत असून एकमेकांवर टीका टिप्पणी करता करता दोन्ही नेते पायरी सोडून बोलत असल्याचे वारंवार समोर आले आहे.

शिरूरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना आव्हान देताना पालकमंत्री अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हे यांना पाडणार असल्याची भूमिका घेतली आहे. त्या दृष्टीने अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचा भाग असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघात भेट देऊन तेथील विकास कामांची तसेच प्रलंबित प्रश्नांची आणि समस्यांची पाहणी केली.

तर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवबंधन हाती बांधलेले संजोग वाघेरे यांचे सेनेत स्वागत करताना ठाकरे यांनी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा उल्लेख गद्दार म्हणून करत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी दिलेले आव्हान मुख्यमंत्री शिंदे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील विविध लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी काढण्यात येणारा पूर्वनियोजन दौरा रद्द करत आता शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातून याची सुरुवात करण्याचे नियोजन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे पार पडली. या बैठकीसाठी राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाइन पद्धतीने जोडले गेले होते. या सर्व पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले.

प्रचार मेळाव्याचा पहिला टप्पा 6 जानेवारीला शिरूर येथून सुरू होणार आहे. तर 11 जनेवारीला छत्रपती संभाजीनगर येथील सभेने पहिल्या टप्प्यातील प्रचारदौरा पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्याला 25 जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्याने सुरूवात होणार आहे. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे देखील आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यांच्या तारखा देखील पुढील काही काळात निश्चित होणार असून त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचा राज्य सरकारच्या विविध योजना राबविल्या जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

(Edited By Ganesh Thombare)

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Manoj Jarange Vs Bhujbal : मनोज जरांगेच्या 'वेड लागलंय' टीकेवर भुजबळ म्हणाले, 'हो मी 35 वर्षांपासून वेडा..'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com