Maharashtra Assembly Elections News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) विविध मतदारसंघातील उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात आहेत.
आतापर्यंत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना शिंदे गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
महाविकास आघाडीत जागावाटपारून बराच पेच निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, आघाडीच्या नेत्यांची बुधवारी एक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळा राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले आणि संजय राऊत (Sanjay Raut) उपस्थित होते.
यावेळी या नेत्यांनी 85+85+85 अशा 270 जागांवर मविआ नेत्यांचं एकमत झाल्याचं सांगितलं. मात्र, त्यांनी सांगितलेला हा फॉर्म्युला आणि त्याची बेरीच चुकल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजत पवार) पक्षाने महाविकास आघाडीची खिल्ली उडवली आहे.
पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबतची माहिती सांगताना संजय राऊत म्हणाले, "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी 85 जागा देण्यात आल्या आहेत.
म्हणजेच, 270 जागांचं जागावाटप झालं आहे. 288 पैकी 270 जागांची यादीही तयार झाली असून उर्वरित 19 जागा इतर मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत." असं राऊतांनी सांगितलं. मात्र, याच पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी (Amol Mitkari) महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
एक्सवर अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं, '85+85+85 = 270 वाह!' या पोस्टमधून त्यांनी मविआची आकडेवारी चुकल्याचं निदर्शनास आणलं आहे. त्यामुळे आता मिटकरींच्या या ट्विटवर महाविकास आघाडीतील नेते काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.