Mumbai : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. आघाडीसोबत जाण्याचा निर्णय, पक्षात पडलेली फुट, मशिदीवर भोंगे, कोरोना काळातील काम अशा अनेक गोष्टींवर बोलत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतले.
2019 पासून राज्याच्या राजकारणात आतापयंत जे घडले त्याला केवळ उद्धव ठाकरे हा एकमेव माणूस कारणीभूत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. ते म्हणाले, 2019 च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपला निवडून दिल. शिवेसना उठली आणि आणि ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत जाऊन बसली ती फक्त मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात घालण्यासाठी. स्वत:च्या स्वार्थासाठी. देशाच्या राजकारणात आतापर्यंत अशी गोष्ट पाहिलीच नाही.
राहुल गांधी यांच्यासोबत हे बसतात कारण स्वत:चा स्वार्थ. एका माणसाने अख्या पक्षाची वाट लावली. निघून गेलेल्या लोकांना हे गद्दार म्हणतात. असे गद्दार तर घरात तिथं बसलाय. ज्याने पक्षाशी गद्दारी केली, असा हल्ला राज ठाकरेंनी चढवला. त्यांनी उद्धव ठाकरेंना भांडखोर सासूची उपमाही दिली. त्यासाठी त्यांनी एक गोष्ट सांगितली.
एक कुटुंब असतं. दोन मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सासू-सुनेचं पटलं नाही म्हणून दुसरीकडे राहायला जातात. लोकं म्हणतात, काय हल्लीच्या मुली घर फोडायचं काम करतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या मुलाच्या लग्नानंतही ते दुसरीकडे निघून जातात. तेव्हा लोकं बोलायला लागतात, काहीतरी सासूमध्येच प्रॉब्लेम आहे. तशी ही शिवसेनेची सासू बसलीय आतमध्ये, तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी मुलं सोडून गेली, त्यांचा प्रॉब्लेम नाही, असे जोरदार टोला राज ठाकरेंनी लगावला.
जे 2019 पासून महाराष्ट्रात घडलंय, ते विसरू नका. जे काही घडलं, त्याला केवळ एकच माणूस कारणीभूत आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे. तिथूनच सगळी सुरूवात झाली. या माणसाच्या वागणुकीमुळे पहिल्यांदा राणे बाहेर पडले, मग मी, नंतर शिंदे बाहेर पडले. जो माणूस बाळासाहेबांना जो त्रास देऊन बाहेर पडला, त्या भुजबळांना हा माणूस मातोश्रीवर जेवायला बोलावतो, असे राज ठाकरे म्हणाले.
हा माणूस कसा वागला, कोरोना काळात कसा वागला, हे सगळं आठवा आणि मतदान करा. या लोकांनी तुमच्या मताचा जो अपमान केलाय, त्याचा बदला तुम्ही घेतला पाहिजे. ही निवडणूक त्याची आहे. तीच लोकं परत निवडून आली तर महाराष्ट्र संपला असे समजा, असे आवाहनही राज ठाकरेंनी मतदारांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.