Eknath Shinde Suspense : शिंदेंना मोदी-शहांचा मेसेज आला तर..! शपथविधीआधी केसरकरांनी वाढवला सस्पेन्स

Eknath Shinde and Modi-Shah Communication : उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत एकनाथ शिंदे यांनी अद्यापही निर्णय घेतलेला नाही.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे, यासाठी शिवसेनेच्या आमदारांकडून मनधरणी केली जात आहे. शिंदे यांच्याकडून अद्यापही त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे शपथविधी सोहळ्याबाबतचा संभ्रम वाढत चालला आहे. त्यातच शिंदेंचे आमदार केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘मेसेज’बाबत विधान केले आहे.

दीपक केसरकर यांनी मीडियाशी बोलताना एकनाथ शिंदे मंत्रिंडळात असावे, अशी आपली इच्छा असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत शिंदे विचार करत आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे खूप ऐकतात. त्यांचा काही मेसेज आला तर शिंदे टाळणार नाहीत. ते मान्य करतील.

Eknath Shinde
Uday Samant : मोठी बातमी : एकनाथ शिंदेंनी पुन्हा वाढवलं टेन्शन! उदय सामंतांनी दिली महत्वाची माहिती...

एकनाथ शिंदे यांचा शपथविधी असताना त्यावेळी दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांनाही फोन आला होता. त्यांनीही उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले होते. आमचे पक्ष वेगळे असले तरी आमची विचारधारा एकच आहे. आमचेही नेतृत्व मोदी आणि शाह हेच आहेत. शिंदे हे आमचे महाराष्ट्रातील सर्वोच्च नेतृत्व आहेत. त्यांच्यावर मोदी आणि शाह हे आमचे नेतृत्व असल्याचे केसरकरांनी सांगितले.

काय म्हणाले उदय सामंत?

उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, आज उपमुख्यमंत्रिपदाबाबत आमच्या आमदारांची नावे येत आहेत. त्याच्याशी आम्ही सहमत नाही. एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची मागणी आहे. आम्ही त्यांना काल विनंती केली आहे, ते त्याचा विचार करतील. ते आज उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

Eknath Shinde
Rising Crime in Pune : महायुती सत्ता स्थापनेची लगबग; पुणेकर भयभीत, ४८ तासात ५ खून

आमचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनीच हे पद स्वीकारावे, ही आमची इच्छा आहे. आम्हाला त्यावर विश्वास असून पुढील अर्धा-एक तासांत ते आमची इच्छा पूर्ण करतील. हे दबावतंत्र नाही. त्यांनी आधीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी आणि खातेवाटप याचा काहीही संबंध नाही. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापेक्षा संघटन वाढवण्याची शिंदेंची इच्छा आहे. पण आम्ही त्यांना याबाबत विनंती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com