
Pune News: मुंबईमध्ये एकीकडे महाराष्ट्राला राजकीय दिशा मिळत असताना दुसरीकडे मात्र गेल्या 48 तासात झालेल्या पाच हत्येंच्या घटनांनी पुणं हादरलं आहे. महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड असं यश मिळाल्यानंतर आठवडाभराने आज महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार आहे. एकीकडे महायुतीमध्ये गृहमंत्रिपदाबाबत तोडगा निघत नसताना दुसरीकडे मात्र पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत. चोरी, घरफोड्या, दरोडे, आणि मारहाणीच्या घटनासोबतच पुण्यात आता खुनाच्या घटना देखील समोर येत आहेत. मागील पाच दिवसात पुणे पोलीस आयुक्तालय परिसरात खुनाचे पाच प्रकार उघडकीस आले आहेत. कोंढवा, वानवडी, सिंहगड आणि वाघोली परिसरात या घटना घडल्या आहेत. सातत्याने घडणाऱ्या या खुनांच्या घटनेने आता पुणेकरकर भयभीत झाले आहेत.
मागील 48 तासात पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस चौकीच्या हद्दीत खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. नऱ्हे परिसरातील मानाजी नगरमध्ये पेट्रोल चोरीच्या संशयावरून चार जणांनी एका २० वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत गणपती विसर्जन मिरवणुकी दरम्यान झालेल्या वादातून ३ अल्पवयीन तरुणांनी सत्तूरने वार करत एका तरुणाची हत्या केली. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कॉलेजला चाललेल्या एका तरुणावर पूर्व वैमनस्यातून कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. रामटेकडीतील जामा मज्जिदीसमोर मंगळवारी ही घटना घडली. या घटनेत 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेला मुलगा बारावी मध्ये शिकत होता. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वाघोली लोहगाव मार्गावरील अभिलाषा सोसायटी येथे बुधवारी राजू लोहार (वय ४८) या व्यक्तीचा दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपी आणि मयत राजू लोहार दोघे दारू पीत बसले होते. दारू पीत असताना राजू लोहार याने आरोपीला उद्देशून तुझा बाप टकल्या आहे, असे चिडवले. यावरून दोघात वाद झाला त्यानंतर आरोपीने जवळ पडलेला दगड उचलून आरोपीच्या छातीवर मारला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राजू लोहार याचा जागीच मृत्यू झाला आहे.
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज सकाळी खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा येथील मीनाताई रुग्णालयासमोर बबलू उर्फ शेगडीवाला या व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. मयत व्यक्ती हा फिरस्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून त्याचा खून करण्यात आलाय. माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.