Maharashtra Congress In-Charge : काँग्रेसचं प्रभारीपद एच.के.पाटलांनी सोडलं; आता नवे प्रभारी कोण ?

Maharashtra Congress: महाराष्ट्रासाठी येणार वर्ष हे निवडणुकांचं वर्ष राहणार आहे.
Maharashtra Congress In-Charge :
Maharashtra Congress In-Charge :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Congress In-Charge : राज्यातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रभारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काँग्रेसचे सध्याचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (H.K.Patil) कर्नाटक (Karnataka) सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या जागी आता नवा प्रभारी नेमला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासाठी येणार वर्ष हे निवडणुकांचं वर्ष राहणार आहे. मुंबई महापालिकेसह राज्यभरातील 25 महापालिकां, लोकसभा,विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विचार करुन काँग्रेसला नव्या प्रभारीची नेमणूक करावी लागणार आहे. त्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी चाचणी सुरु केल्याचीही माहिती समोर आली आहे. 18 जूनला काँग्रेस नेते राहुल गांधी भारतात आल्यानंतर याबाबतच्या हालचालींना वेग येईल, अशीही चर्चा आहे.

Maharashtra Congress In-Charge :
Yavatmal District News : भाजपला मजबूत करण्यासाठी हवाय ‘मंत्रिपदाचा बूस्टर’, चर्चेत ‘ही’ दोन नावे...

पण यावेळी महाराष्ट्रातला प्रभारी नेमताना काँग्रेसला काही विशिष्ट गोष्टींचीही काळजी घ्यावी लागणार आहे. महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आहे. महाराष्ट्र प्रभारी निवडताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार,शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस नेतृत्वाला चर्चा करुन निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे महाराष्ट्राचा काँग्रेसचा नवा प्रभारी कोण असेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मुळचे कर्नाटक राज्यातील गदग येथील रहिवासी असलेले एच. के. पाटील हे सप्टेंबर 2020 पासून महाराष्ट्राचे प्रभारी होते. २०१८ मध्ये म्हणजे एच. के. पाटील यांच्या आधी मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्राचे प्रभारी होते. 2019 च्या निवडणुकींपुर्वी खर्गेंसारखा नेता काँग्रेसने महाराष्ट्रात पाठवला. आता महाराष्ट्रातील निवडणुकांनाही एक वर्षाचा कालावधी उरला आहे. राज्यातील राजकीय घडामोडी आणि वातावरण पाहता यावेळी काँग्रेस प्रभारीपदाची जबाबदारी कुणाला देणार हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra Congress In-Charge :
Ahmednagar Politics: नगर जिल्ह्यात तणाव का वाढतोय? खासदार सुजय विखेंनी सांगितलं 'हे' कारण

कर्नाटकात मंत्रीपद मिळाल्याने एच. के. पाटील यांना महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद सोडावं लागेल. मंत्रीपदाची काम करताना संघटनेचं काम करण्यासाठी मर्यादा राज्यात मंत्री बनलेल्या व्यक्तीला संघटनेचं काम करण्यात मर्यादा येतात. प्रभारी म्हणून काम करताना अनेक दौरेही करावे लागतात.पण कर्नाटक सरकारमध्ये मंत्री झालेल्या पाटील यांना आता महाराष्ट्र काँग्रेसचं प्रभारीपद सोडावं लागणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.