
Maharashtra Election 2024 Final Results LIVE : लोकसभेला आलेल्या अपयशातून धडा घेत विधानसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळपासून जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार राज्यात महायुती 221 जागेवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
तर एकट्या भाजपची (BJP) 127 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. भाजप पाठोपाठ शिवसेना (एकनाथ शिंदे) 56 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 38 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे आता राज्यात महायुतीची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
अशातच आता राज्यातील भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. शिवाय राज्यातील यशाचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे.
फडणवीस यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'एक है तो ‘सेफ’ है! मोदी है तो मुमकिन हैं!' त्यामुळे महायुतीने (Mahayuti) प्रचारा दरम्यान, राज्यभरात दिलेली घोषणा 'एक है तो ‘सेफ’ है! याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधल्याचं पाहायला मिळत आहे. एकंदरीतच आता महायुतीला राज्यात मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यामुळे राज्यभरात महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करायला सुरूवात केली आहे.
तर देवेंद्र फडणवीस यांच्या आईने देखील राज्यातील निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. "देवेंद्रची अविश्रांत मेहनत आणि लोकांचं त्याच्यावर असलेलं प्रेम या दोन्ही गोष्टीमुळे त्याला हा मोठा विजय मिळाला आहे. महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की त्याने महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.