Exit Poll Results : ठाकरेंची शिवसेना अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जोरदार मुसंडी? शिंदे, अजितदादांना किती जागा मिळणार? 'एक्झिट पोल' काय सांगतात?

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन बलाढ्य पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची तर केलीच होती, शिवाय बंडखोरांना पराभूत करण्यासाठी मोठी फिल्डिंगही लावली होती.
Mahavikas Aghadi, Mahayuti
Mahavikas Aghadi, MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता.20) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. काही ठिकाणचा राडा, गोंधळ यांचा अपवाद वगळता संपूर्ण महाराष्ट्रात शांततेत मतदान पार पडले. मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहे.

त्यात महायुतीचं (Mahayuti) पारडं जड असल्याचं सध्यातरी दिसून येत आहे.तर महाविकास आघाडीला बहुमतापासून काहीसं दूर असल्याचं पाहायला मिळत आहे.यातच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारल्याचे समोर येत आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन बलाढ्य पक्ष फुटल्यानंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची तर केलीच होती, शिवाय बंडखोरांना पराभूत करण्यासाठी मोठी फिल्डिंगही लावली होती.आणि वेगवेगळ्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, यात पवार आणि ठाकरे हे यशस्वी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Mahavikas Aghadi, Mahayuti
Jharkhand Election 2024 Exit Poll LIVE : झारखंडमध्ये कोणाचे सरकार येणार? काय म्हणतात एक्झिट पोलचे आकडे...

'इलेक्टोरल एज'च्या कलचाचणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 46 जागा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 14 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

'पोल डायरी'च्या एक्झिट पोलनुसार शरद पवार यांचा पक्ष अजितदादांच्या पक्षावर वरचढ ठरत असल्याचं दिसून येत आहे.त्यात 25-39 जागा मिळण्याची शक्यता आहे.तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 18-28 जागा मिळण्याची शक्यता आहे.

‘चाणक्य स्ट्रॅटेजीस’च्या कलचाचणीत महायुतीला स्पष्ट बहुमत दाखवण्यात आले आहे. त्यात महायुती 152 ते 160 जागा मिळवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 40 जागांवर तर अजित पवारांचा पक्ष 28 जागा जिंकणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ही 48 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 35 जागांवर विजय मिळवणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Mahavikas Aghadi, Mahayuti
Devendra Fadnavis meet Mohan Bhagwat : 'एक्झिटपोल'चे आकडे जाहीर होताच फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट

'इलेक्टोरल एज'च्या अंदाजानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 44 जागांवर मुसंडी मारणार असल्याचं दिसून येत आहे. तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) अवघ्या 26 जागांवर जिंकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पोलनुसार ठाकरेंना दिलासा तर शिंदेंना धक्का बसणार असल्याची माहिती समोर येत आहे.

'MATRIZE'च्या आकडेवारीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 37-45 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 21-39 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 17-26 जागा मिळण्याची शक्यता आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 35-43 जागांपर्यंत मजल मारणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Mahavikas Aghadi, Mahayuti
Exit Poll Result Vidhansabha Election : एक्झिटपोलनुसार महाराष्ट्रात महायुतीचंच पारडं जड; 'मविआ' बहुमतापासून लांबच!

'पोल डायरी'च्या एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरेंवर भारी ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यात शिंदे यांच्या पक्षाला 27-50 तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 16-35 जागांवर विजय खेचून आणणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार, शिवसेना शिंदे गटाला राज्यात 25 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 44 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 42 जागा मिळणार असल्याचं पुढं आलं आहे.

Mahavikas Aghadi, Mahayuti
Assembly Election Exit Poll : सर्वाधिक जागा भाजपला, युती की आघाडीची सत्ता? एक्झिट पोलने कुणाचं वाढवलं टेन्शन?

या वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार सध्यातरी महायुती वरचढ ठरत असून आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मोठी मजल मारल्याचं पाहायला मिळत आहे.महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही धडाकेबाज कामगिरी केल्याचं दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com