Maharashtra fuel stock : सरकार म्हणतेय, इंधनाचा पुरेसा साठा! डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर रांगा लागलेल्या अकोला, वाशिमसह 11 जिल्ह्यांची आकडेवारीच केली जाहीर...

Diesel queues Maharashtra, Petrol pump news : अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत छगन भुजबळांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही दिली.
Maharashtra government fuel update
Maharashtra government fuel updateSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra government fuel update : इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर डिझेलसाठी शेतकऱ्यांचा रांगा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवरील इंधनाचा साठा अपुरा असल्याने विक्री बंद ठेवावी लागत असल्याचा आरोपही होतोय. काही ठिकाणी तर हाणामारीच्या घटनाही घडल्या आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून इंधनाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात इंधनटंचाई नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत आहे. मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याचे भुजबळांनी सांगितले.

अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत भुजबळांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही दिली. तसेच नागरिकांनी आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी, असे आवाहनही भुजबळ यांनी राज्यातील जनतेला केला.

Maharashtra government fuel update
Supreme Court : शैक्षणिक, आर्थिक प्रगती झालेल्या कुटुंबातील मुलांना आरक्षण का? सुप्रीम कोर्टाने वाढविली धडधड

कोणत्या जिल्ह्यात किती विक्री?

राज्य सरकारने ११ जिल्ह्यांतील १९ मे रोजीची पेट्रोल व डिझेल विक्री, दैनंदिन सरासरी विक्री, विक्रीत झालेली वाढ याबाबतची माहिती प्रसिध्द केली आहे. अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, धाराशीव, परभणी आणि वाशिम या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात डिझेलच्या मागणीत दुपटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसते. त्याखालोखाल बीड आणि जळगाव जिल्हा आहे.

Maharashtra government fuel update
CJP Campaign : 'कॉक्रोच जनता पार्टी'कडून पहिल्या मोहिमेची घोषणा, एक केंद्रीय मंत्री निशाण्यावर; काही मिनिटांत अभिजीत दीपके यांना जीवे मारण्याची धमकी

पेट्रोलपेक्षा डिझेलच्या मागणीत राज्यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून अधिकाधिक डिझेल खरेदी केले जात आहे. इराण युध्दाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर अचानक इंधनच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र राज्यात दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com