Jitendra Awhad News : खासगी क्षेत्रातील कामगारांना सरकारचा मोठा धक्का, कामाचे तास वाढणार?

Maharashtra Govt’s Proposal on Work Hours : आधीच महागाई, स्थिर पगार, बेरोजगारी आणि नोकरीची असुरक्षितता यामुळे कामगार दबावाखाली आहेत. आता अजून तासभर कामावर दबाव वाढवला जाणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
Government of Maharashtra
Government of MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad’s Statement on Labour Policy : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खासगी क्षेत्रातील कामगारांविषयी मोठा दावा केला आहे. या कामगारांचे कामाचे तास नऊ वरून दहा करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने सादर केल्याचे त्यांनी म्हटले आहे. महायुती सरकारचा सर्वसामान्यांना धोका, अशी पोस्ट आव्हाड यांनी सोशल मीडियात केली आहे.

आव्हाड यांनी पोस्टमध्ये मोठा दावा केल्याने खासगी क्षेत्रातील कामगारांसाठी हा मोठा धक्का असू शकतो. आव्हाडांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने खाजगी क्षेत्रातील कामगारांसाठी दररोज कामाचे तास 9 वरून 10 करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. “महाराष्ट्र शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट्स एक्ट, 2017” मध्ये हे बदल केले जातील.

दररोज 10 तास काम (आधी 9), अर्धा तास ब्रेक दिला तरी सलग 6 तास काम करवता येईल, ओव्हरटाईम तीन महिन्यांत 125 वरून 144 तास, ओव्हरटाईम मर्यादा 10.5 वरून 12 तास, तातडीच्या कामासाठी (urgent work) कोणतीही मर्यादा नाही, 24 तासही पिळवणूक शक्य, असे मुद्दे आव्हाड यांनी पोस्टमध्ये मांडले आहेत.

Government of Maharashtra
Manoj Jarange Patil Update : दुसरेही आंदोलन, पाचच वाहने, पार्किंग कुठे, कारवाईचा इशारा..! वाचा जरांगेंच्या आंदोलनासाठी पोलिसांची नियमावली...

आधीच महागाई, स्थिर पगार, बेरोजगारी आणि नोकरीची असुरक्षितता यामुळे कामगार दबावाखाली आहेत. आता अजून तासभर कामावर दबाव वाढवला जाणार आहे. लोकांना मतदानाच्या वेळी “कामगार हिताचे” आश्वासन दिले जाते, पण प्रत्यक्षात निर्णय कारखानदार व भांडवलदारांसाठी घेतले जातात, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

Government of Maharashtra
‘शिवतीर्थ’वर बाप्पासमोर ठाकरे बंधूंनी जोडले हात; 22 वर्षांची प्रतिक्षा संपली, पाहा खास फोटो...

लक्षात ठेवा, जे सरकार मतदारांच्या जीवनाची किंमत भांडवलदारांच्या नफ्यापेक्षा कमी मानते, ते सरकार लोकांचे नसून भांडवलदारांचे असते. आज हा प्रस्ताव, उद्या कायद्याचा भाग झाला तर कामगार गुलामगिरीच्या युगात ढकलले जातील. जागे व्हा, कामगारांचा अधिकार वाचवा, असेही आव्हाड यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com