महाराष्ट्रात यापुढे ओमिक्रॉनच्या चाचण्या बंद; राज्य सरकारचा मोठा निर्णय

बुधवारी राज्यात 144 ओमिक्रॉनचा संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईतील 100 रुग्ण आहेत.
Omicron Variant

Omicron Variant

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. यातील अनेक रुग्णांना ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग होत असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने (State Government) आता ओमिक्रॉनची स्वतंत्र चाचणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे महाराष्ट्रात (Maharashtra) ओमिक्रॉनच्या रुग्णांची स्वतंत्र माहिती दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बुधवारी राज्यात 144 ओमिक्रॉनचा संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. त्यापैकी एकट्या मुंबईतील 100 रुग्ण आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण 797 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र, महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सच्या (Task Force) सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 55 टक्के रुग्ण ओमिक्रॉनबाधित असल्याचे समोर आले आहे.

<div class="paragraphs"><p>Omicron Variant</p></div>
महाराष्ट्रात लॉकडाऊन कधी? आरोग्य विभागाने थेट आकडेच सांगतिले...

या स्थितीमुळे ओमिक्रॉन तपासणीसाठी जनुकीय चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांवरील ताण वाढला आहे. या चाचण्यांसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 86 टक्के नमूने ओमिक्रॉनसाठी पॉझिटिव्ह येत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तसेच एका चाचणीसाठी 260 रुपये खर्च येत आहे. जनुकीय चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्याही कमी आहे. त्यामुळे या चाचण्याच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता यापुढे एकाही रुग्णाच्या नमुन्यांची ओमिक्रॉनसाठी जनुकीय चाचणी केली जाणार आहे. परिणाणी, यापुढे एकही रुग्ण अधिकृतपणे ओमिक्रॉनबाधित म्हणून जाहीर केला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, बुधवारी राज्यात 26 हजार 538 रुग्ण आढळून आले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात असून राज्य सरकारकडून निर्बंध वाढविण्याचा विचार सुरू आहे. राज्यात लॉकडाऊन करण्याबाबतच धोरणही निश्चित करण्यात आल्याचे समजते. आरोग्य विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या लॉकडाऊन करण्यासारखी स्थिती नाही. राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची दैनंदिन मागणी 800 मेट्रिक टनाहून अधिक वाढल्यास महाराष्ट्रात लॉकडाऊन किंवा लॉकडाऊनप्रमाणे निर्बंध लागू करण्याचा विचार केला जाईल. तसेच राज्यातील रुग्णालयांमधील कोरोना बेड 40 टक्क्यांपेक्षा जास्त भरल्यासही याचा विचार होऊ शकतो, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com