Mumbai Politics : 'महाराष्ट्र से बिहार तक...', उत्तर भारतीय सेनेने ठाकरे बंधूंना डिवचलं, थेट मातोश्रीबाहेर बॅनरबाजी करत परप्रांतियांना दिला सावधानतेचा इशारा

Maharashtra Nagar Parishad Election 2025 : आगामी मुंबई महापालिकेसह इतर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे एकत्रित लढणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. शिवाय ठाकरेंनी मराठी भाषेचा आणि परप्रांतियांचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
A banner put up by the North Indian Sena outside Matoshree warns North Indians to stay united ahead of the Maharashtra Nagar Parishad elections, intensifying the Mumbai political atmosphere.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Nov : राज्य निवडणूक आयोगाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे.

तर मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे एकीकडे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे मुंबईत उत्तर भारतीय सेनेने थेट 'मातोश्री'च्या बाहेर उत्तर परप्रांतियांना सावधानतेचा इशारा देत एकसंध राहण्याचं आवाहन करणारे बॅनर लावले आहेत.

या बॅनरमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कारण आगामी मुंबई महापालिकेसह इतर नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरे एकत्रित लढणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. शिवाय ठाकरेंनी मराठी भाषेचा आणि परप्रांतियांचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Eknath Shinde : 'एकनाथ शिंदे हे महिलांच्या मनातले मुख्यमंत्री...', भाजपच्या बड्या नेत्यासमोरच विधान परिषदेच्या उपसभापतींचं भुवया उंचावणारं वक्तव्य

अशातच आता उत्तर भारतीय सेनेने केलेली बॅनरबाजी अप्रत्यक्षरित्या ठाकरेंना डिवचण्यासाठी केल्याची चर्चा सुरू झाली आहे. या बॅनरवर 'सावधान' असा इशारा देत, 'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे, महाराष्ट्र से बिहार तक, राजस्थान से यूपी तक' असं लिहिलं आहे.

तर या बॅनरवर उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांतचं विभाजन होऊ नये यासाठी आता परप्रातियांना उत्तर भारतीय सेनेकडून आवाहन केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Zohran Mamdani : डोनाल्ड ट्रम्पच्या धमकीचा परिणाम नाहीच, भारतीय वंशाच्या जोहरान ममदांनीचा न्यूयॉर्क महापौर निवडणुकीत दणदणीत विजय

उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी मागील काही दिवसांत महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणांविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. अशातच आता त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या बॅनरबाजीमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com