Sanjay Gaikwad controversy : "कडक समज द्या, अन्यथा…"; CM फडणवीसांच्या तंबीनंतर एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाडांना दिली समज; नेमकं काय म्हणाले?

Sanjay Gaikwad's statement : महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं, भारतात आणि जगात कुठेही नाही. पोलिसांनी छापेमारीत 50 लाख पकडले तर ते 50 हजारच दाखवतात, असं खळबळजनक आणि वादग्रस्त विधान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं.
Sanjay Gaikwad, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Sanjay Gaikwad, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 27 Apr : महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं, भारतात आणि जगात कुठेही नाही. पोलिसांनी छापेमारीत 50 लाख पकडले तर ते 50 हजारच दाखवतात, असं खळबळजनक आणि वादग्रस्त विधान शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाडांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवत कारवाईचा इशारा दिला आहे.

"मी एकनाथ शिंदेंनी संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी, अन्यथा अॅक्शन घेतली जाईल", असं म्हणत फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला. फडणवीसांनी तंबी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील फोनकरून आपल्या आमदाराचे कान टोचल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदेंनी गायकवाड यांच्यावर नाराजी दर्शवत अशा पध्दतीची आक्षेपार्ह विधानं लोकप्रतिनधींना शोभत नाहीत. त्यामुळे यापुढे बोलताना काळजी घेण्याची समज दिली आहे. शिवाय काही पोलिसांनी आक्षेपार्ह वर्तन केलं म्हणून संपूर्ण पोलिस यंत्रणेला दोष देणं अत्यंत चुकीचं आहे.

Sanjay Gaikwad, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Top Ten News : पहलगाम हल्ल्यानंतर सरसंघचालकांचे मोठे विधान ; शिंदेंच्या आमदारावर सीएम फडणवीसांचा संताप - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

महाराष्ट्र पोलिस दल हे त्याग आणि शौर्याचं प्रतिक आहे. पोलिस रात्रंदिवस काम करतात म्हणून आपण आनंदाने सण-उत्सव साजरे करू शकतो, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटल्याची माहिती आहे. शिवाय पोलिसांबद्दल काही तक्रारी असतील तर मुख्यमंत्री किंवा माझ्याकडे दाद मागू शकता. मात्र, माध्यमांसमोर असं वक्तव्य करणं लोकप्रतिनिधींना शोभत नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Sanjay Gaikwad, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Pahalgam terror attack : काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचं सर्वात मोठं कोंबिंग ऑपरेशन; दहशतवाद्यांशी हात मिळवणी करणाऱ्या 446 हून अधिक लोकांना घेतलं ताब्यात

संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, "महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात कुठेही नसेल. पोलिस खातं म्हणजे शासनाने कोणताही कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला. गुटखा बंदी केली की यांचा हप्ता वाढला.

दारू बंदी केली की यांनी चालू करायची की लगेच त्यांचा हप्ता वाढवायचा. राज्यातील आणि देशातील पोलिसांनी इमानदारीने काम जर केलं तर जगातील सर्व गुन्हेगारी समाप्त होऊ शकते. फक्त पोलिसांनी प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com