Sanjay Raut: संजय राऊत हे सगळं खोट लिहितात, आपल महत्व वाढवण्यासाठी धडपड?

MP Sanjay Raut Book Narkatla Swarg:अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच शिवसेना आणि भाजपात दरी पडली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, "अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच भाजपा आणि शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली.
Sanjay Shirsath & Sanjay Raut
Sanjay Shirsath & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

खासदार संजय राऊत यांनी आपल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात राजकारणातील अनेक गौप्यस्फोट केले आहेत. राजकीय वर्तुळात गेल्या तीन दिवसांपासून केवळ संजय राऊत यांच्या या पुस्तकाचीच जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, शिवेसेनेतील फूट यावर राऊतांनी भाष्य केलं आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ज्येष्ठ लेखक, कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचा प्रकाशन नुकतेच झाले. या पुस्तकाबाबत शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला. संजय राऊत हे सगळं खोट लिहितात, आपल महत्व वाढवण्यासाठी संजय राऊत प्रयत्न करीत आहे, असा टोला शिरसाट यांनी राऊतांना लगावला.

ईडीने अटक करण्याच्या एक दिवस आधी मला एकनाथ शिंदेंनी फोन केला होता असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं आहे. आपण अमित शाह यांच्याशी बोलू का अशी ऑफरही त्यांनी दिली होती असा संजय राऊतांचा दावा आहे. मात्र आपण समर्थ असून, वर बोलण्याची गरज नसल्याचं सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात दिली.

Sanjay Shirsath & Sanjay Raut
Local Body Elections: शिंदेसेना-भाजपमध्ये चुरस! जास्त जागा मिळवण्याची चढाओढ

अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच शिवसेना आणि भाजपात दरी पडली, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत म्हणाले की, "अमित शाह दिल्लीत आल्यानंतरच भाजपा आणि शिवसेनेत दरी पडायला सुरुवात झाली.

अमित शाह यांना अरुण जेटली यांनीही असं करु नका असं समजावलं होतं. मला माहिती आहे, अरुण जेटली मला स्वत: बोलले होते, अमित भाई हे करणं योग्य नाही. ते आपले जुने सहकारी आहेत. आपल्याला त्यांच्यासह राहायचं आहे. अरुण जेटलींनीच मला सांगितलं होतं की, मी दोन वेळा त्यांना समजावलं आहे", असे सांगत राऊतांना शाह यांच्याबाबत अनेक गौप्यस्फोट केले.

Sanjay Shirsath & Sanjay Raut
Operation Sindoor:सैन्यांची ताकद आणखी वाढणार; मोदी पुरवणार मोठी 'रसद'; हिवाळी अधिवेशनात मिळणार मंजुरी

संजयचं पुस्तक वाचून लोकांच्या मनातील तुरुंगाची भीती निघून जाईल. या पुस्तकातील घुशी आणि सशांचे उल्लेख वाचून आपल्याला बरं वाटतं. पण तुरुंगात यातना भोगताना काय वाटलं असेल? संजय तू या पुस्तकाने लोकांना प्रेरणा देण्याचं काम केलं आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राऊतांचे कौतुक केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com